तुमच्या खास रेसिपी येतील लोकप्रिय दिनदर्शिकेवर; कालनिर्णयच्या स्पर्धेसाठी असं करा Apply

तुमच्या खास रेसिपी येतील लोकप्रिय दिनदर्शिकेवर; कालनिर्णयच्या स्पर्धेसाठी असं करा Apply

कालनिर्णयनं यंदाही आपल्या वाचकांसाठी ‘पाकनिर्णय-2021’ ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : तुम्ही बनवत असलेले चमचमीत पदार्थ आता सर्वांसोबत शेअर करण्याची सुवर्णसंधी तुमच्याजवळ आहे. छान रुचकर पदार्थ बनवणाऱ्यांसाठी कालनिर्णय एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे ते ही स्पर्धेच्या माध्यमातून...

कालनिर्णयनं यंदाही आपल्या वाचकांसाठी ‘पाकनिर्णय-2021’ ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेअंतर्गत तुम्हाला तुमचा पदार्थ कालनिर्णयाच्या वाचकांसोबत शेअर करता येणार आहे. सँडविचेस, लाडू, मक्याच्या प्रकारांपासून बनवलेले पदार्थ आणि फळांपासून बनवलेले पदार्थ या चार विभागात स्पर्धकांना आपल्या पाककृती पाठवाव्या लागणार आहेत.

paknirnay@kalnirnay.com या ईमेल आयडीवर किंवा ‘पाकनिर्णय 2021, सुमंगल प्रेस प्रा. लि., 172, एम. एम. जी. एस. मार्ग, दादर (पू.), मुंबई 400 014’ या पत्त्यावर पोस्ट/कुरियरने आपली पाककृती आणि पाककृतीचा फोटो स्पर्धकांना पाठवावा लागणार आहे. तसेच, स्पर्धकांना आपली पाककृती www.kalnirnay.com/paknirny या लिंकवर अपडलोडही करता येणार आहे. यासाठी स्पर्धकानं प्रथम आपलं नाव, पत्ता, त्यानंतर पदार्थाचे नाव, साहित्य आणि कृती लिहायची आहे. पाककृती पाठवण्यासाठी 15 मे, 2020 ही अंतिम तारीख आहे.

सर्वोत्कृष्ट 12 पाककृती ‘कालनिर्णय 2021’ तर उत्तेजनार्थ 18 पाककृती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2020’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. काही खास पाककृती ‘स्वादिष्ट 2021’ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्पर्धकांना www.kalnirnay.com/paknirnay या वेबसाईटवर स्पर्धेची अधिक माहिती मिळवता येईल.

First published: January 28, 2020, 8:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading