जखम कोणतीही असो डॉक्टरकडे जाण्याआधी असा करा प्रथमोपचार

जखम कोणतीही असो डॉक्टरकडे जाण्याआधी असा करा प्रथमोपचार

कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास त्यावर वैद्यकीय उपचार तातडीने घेणं आवश्यक असतं, नाहीतर संसर्गाचा धोका बळावतो.

  • Last Updated: Nov 19, 2020 08:12 AM IST
  • Share this:

जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी जखम किंवा दुखापत होतेच. किरकोळ जखम ही एक प्रकारची दुखापत आहे ज्यामध्ये त्वचा चिरते, फाटते. अचानक पडणं, एखाद्या वस्तूला ठेच लागून दुखापत होणं किंवा यंत्रामुळे अपघात होणं आणि वाहनानं अपघात होणं सामान्य आहे. कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यास वैद्यकीय उपचार तातडीने घेणं आवश्यक असतं.

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. राजलक्ष्मी व्ही. के म्हणतात की, जखमा देखील भिन्न प्रकारच्या असतात. ठोस पृष्ठभाग किंवा कशानंही घासल्यास जखम होते. घासण्यामुळे झालेल्या जखमेमध्ये जास्त रक्त वाहत नाही. मात्र संसर्ग टाळण्यासाठी तो भाग स्वच्छ करणं आवश्यक आहे. त्वचेवर पेन, सुई किंवा नख लागल्यामुळे तीक्ष्ण जखम होते. कधीकधी अधिक तीक्ष्ण वस्तूमूळे त्वचेतून जास्त रक्तस्राव होतो आणि जखमेच्या अंतर्गत अवयवांचं नुकसान होण्याचा धोका असतो. यासाठी संसर्ग टाळण्यासाठी टिटॅनसचे इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे.

चाकू, एखादं साधन किंवा यंत्र इत्यादीसारख्या इतर धारदार वस्तूंनी काम करत असताना एक खोल जखम होऊ शकते आणि त्यातून सतत रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. गंभीर अपघातांमुळे किंवा बंदुकीची गोळी लागणं यासारख्या दुखापतीमुळे त्वचेला खोल घाव होतो आणि अविरत रक्तस्त्राव होतो. या प्रकारच्या जखमेसाठी त्वरित वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

हे वाचा - त्वचा भाजल्यानंतर छोटीशी चूकही पडू शकते महागात; उपचाराची योग्य पद्धत समजून घ्या

घरगुती आणि वैद्यकीय दोन्ही उपचारांनी जखम बरी करता येते. घरच्या घरी लहान सहान जखमा बऱ्या होऊ शकतात. myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, जखम स्वच्छ करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ पाण्यानं किरकोळ जखमा स्वच्छ करा. जखम झालेला भाग सौम्य साबणानं 10 ते 15 मिनिटं हलक्या हातानं थंड पाण्यानं धुवा. यामुळे घाण आणि जीवाणू काढून टाकण्यास मदत होईल. स्वच्छ रुमाल वापरून हलक्या हातानं तो भाग कोरडा करून घ्या आणि नंतर त्यावर निर्जंतुकीकरण मड्रेसिंग किंवा पट्टी लावा. सलग पाच दिवस जखमेच्या स्वच्छतेची आणि मलमपट्टीची प्रक्रिया करा.

मोठ्या जखमांसाठी डॉक्टरकडे जा जेणेकरून ते शरीरातील जखमेच्या स्थितीवर आणि संसर्गाच्या संभाव्यतेच्या आधारावर उपचार प्रक्रिया निवडू शकतील. इतर पर्यायांमध्ये जखमेच्या वेदना कमी करण्यासाठी औषधांचा समावेश आहे. या प्रक्रियेमध्ये संसर्गाची शक्यता जास्त असल्यास डॉक्टर प्रतिजैविक खाण्याचा सल्ला देतात. तर काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

हे वाचा - भूक न लागणं आणि पचनात त्रास पोट नाही तर फुफ्फुसाच्या समस्येचं लक्षण

जखमेवर अनेकदा खाज सुटते कारण जखम बरी होण्याच्या वेळेस नवीन ऊतक जुन्या ऊतकांची जागा घेण्यास सुरुवात करतात. जर जखमेवर खाजवलं तर ती बरी होण्याची वेळ वाढते आणि संसर्ग होण्याचा धोकाही असतो, ओरखडे राहण्याची शक्यता देखील वाढेल. त्यामुळे शक्यतो जखम खाजवू नका. जर जखमेवर जास्त खाज सुटली असेल आणि खाजवल्यानंतर जाड किंवा हलका पिवळा द्रव वाहू लागला तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - उघडी जखम: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 19, 2020, 8:12 AM IST

ताज्या बातम्या