ऑफिसमध्ये महिलांनाच का वाजते सर्वात जास्त थंडी

ऑफिसमध्ये महिलांनाच का वाजते सर्वात जास्त थंडी

ऑफिसमध्ये एसीचं तापमान कमी केलं की सर्वाधिक थंडी ही महिलांनाच वाजते. थोड्या थोड्या वेळाने अनेक महिला स्टोल, जॅकेट, शॉल अशा उबदार गोष्टी घालून बसलेल्या दिसतात.

  • Share this:

ऑफिसमध्ये अनेकदा पाहण्यात आलंय की, थंडी असो वा गरमी ऑफिसमध्ये एसीचं तापमान कमी केलं की सर्वाधिक थंडी ही महिलांनाच वाजते. थोड्या थोड्या वेळाने अनेक महिला स्टोल, जॅकेट, शॉल अशा उबदार गोष्टी घालून बसलेल्या दिसतात. महिलांना सर्वातआधी ऑफिसमध्ये थंडी का वाजते हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याच्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा झाला.

ऑफिसमध्ये जेव्हा कमी तापमानात एसी वापरला जातो तेव्हा सर्वात जास्त थंडी महिलांला वाजते. यासंबंधात संशोधनात म्हटलं की, ऑफिसमध्ये महिला या जास्त तापमानात चांगलं काम करतात, तर पुरुषांमध्ये कमी तापमानात चांगलं काम करण्याची क्षमता असते. या संशोधनात 500 लोकांना सहभागी केलं गेलं होतं. यात 24 ग्रुप तयार करण्यात आले होते. 61 ते 91 फॅरेनहाइटवर अनेक प्रश्न विचारण्यात आले. अखेर उच्च तापमानात महिला जास्त चांगलं काम करतात हे उत्तर मिळालं. तसंच अतीथंडीचा महिलांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

शरीराच्या संरचनेमुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते. महिलांमधअये मेटाबॉलिक रेट कमी असतो, त्यामुळे शरीर हिट कमी रिलीज करतं. त्यामुळेच त्यांच्या शरीरात गरमी पुरुषांपेक्षा कमी असते. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये महिला पुरुषांच्या तोडीने काम करत असतानाही एसीचं तापमान हे पुरुषांच्या गरजेनुसार सेट केलं जातं. महिलांसाठी 77 डिग्री फॅरेनहाइट अर्थात 25 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान आहे. तर पुरुषांसाठी 72 डिग्री फॅरेनहाइट अर्थात 22 डिग्री सेल्सियस हे योग्य तापमान असतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा आलाय कंटाळा, तर आलाय नवीन ‘स्टँडिंग डेस्क’

...म्हणून दिवसरात्र नवरा- बायको भांडतात, रिसर्चमध्ये समोर आलं कारण

मनी प्लान्ट नाही तर हे रोप घरी लावा आणि व्हा श्रीमंत

VIDEO: ...जेव्हा महिलेने किचनमध्ये पाहिला 5 फूट लांबीचा कोब्रा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 04:17 PM IST

ताज्या बातम्या