मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नैराश्यातून बाहेर पडायचंय? शास्त्रज्ञ म्हणतात, Music Therapy घ्या !

नैराश्यातून बाहेर पडायचंय? शास्त्रज्ञ म्हणतात, Music Therapy घ्या !

संगीताशी संबंधित पुस्तकांवरही शून्य टक्के GST आहे.

संगीताशी संबंधित पुस्तकांवरही शून्य टक्के GST आहे.

संगीत (Music)ऐकल्यावर तुम्हाला बरं वाटतं का? तुमच्या मनातील नकारात्मक विचारांची छाया दूर होते का? याचं उत्तर 'हो' असल्याचं अनेकजण देतील. शास्त्रज्ञांच्या एका गटानंही संगीत ऐकण्यानं मनातील नकारात्मक भावनांचा निचरा होण्यास मदत होते, असं सिद्ध केलं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 16 डिसेंबर:  सध्याच्या कोरोना महासाथीमुळं (Corona Pandemic)निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत तर गाणं ऐकणं हा उपाय अत्यंत सुंदर आहे. सध्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भीती, एकटेपणा, व्याकुळता, निराशा दिसून येत आहे. भविष्याची चिंता सतावते आहे. आगामी ख्रिसमससारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील नकारात्मकता दूर करता आली तर ते सणाचा आनंद घेऊ शकतील आणि त्यांना नवी उमेद मिळेल. यंदा सण साजरा करतानाही कमीतकमी लोकांमध्ये, अंतर राखून अनेक नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीत मनाची उभारी वाढवण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे ‘इमोशनल डिटॉक्स’ (Emotional Detox) अर्थात नकारात्मक भावना दूर करणं. यामध्ये आपल्याला नकारात्मक घडविणाऱ्या भावना नियंत्रित करणं हा महत्त्वाचा उपाय आहे. विज्ञानानं हे सिद्ध केलं आहे की, नकारात्मक भावना आपलं मानसिक संतुलन बिघडवतात आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो, असं ‘क्यूओबझ’ (Qobuz) या संगीत प्रसारित करणाऱ्या कंपनीचे आरोग्य सल्लगार सीन ल्युझि (Sean Luzy) यांनी सांगितलं. अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे की, संगीतात ताण दूर करण्याची शक्ती आहे. ज्याचा उपयोग नकारात्मक भावना नियंत्रित करण्यासाठी होतो. आपल्या चेतासंस्था आणि न्यूरोएन्डोक्राईन सिस्टीम वर त्याचा चांगला परिणाम होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात हे शोधणं कठीण आहे की, रिहानाची गाणी, पॉल एन्काची गाणी आणि द रोलिंग स्टोन्स यापैकी कोणती गाणी आपल्या प्रकृतीला जास्त लाभदायक आहेत. बर्कले इथल्या एका अभ्यास गटानं याचाही अभ्यास केला. त्यांनी काही हिट गाण्यांवरील अमेरिका आणि चीनमधील तब्बल 2500 श्रोत्यांच्या भावनिक प्रतिसादाचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी एड शीरानच्या ‘द शेप ऑफ यू’ आणि जॉज या साउंडट्रॅकची निवड केली होती. या अभ्यासात त्यांना असे आढळले की, संगीत ऐकल्यानं 13 वेगवेगळ्या भावनिक स्थित्यंतराची नोंद घेतली. आनंद, राग, रोमांच, त्रास, कामुक, अशा अनेक प्रकारच्या भावना त्यांनी नोंदवल्या. संगीत ऐकण्याचे अधिक चांगले परिणाम हवे असतील तर, ते विशिष्ट पद्धतीनं ऐकणं आवश्यक आहे. अनेकदा लोक जेवताना, चालताना किंवा घरातून काम करताना वेळ घालवण्यासाठी त्यांच्या आवडत्या कलाकाराचे संगीत ऐकतात. सीन ल्युझि यांच्या मते, अशी सवय तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करेल. पार्श्व संगीताची गुण वैशिष्ट्ये वेगळी असतात. तुम्ही ज्या वेळी संगीत पूर्ण वेळ देऊन ऐकत असता, तेव्हा दहा - वीस मिनिटांचे पीस ऐकणं चांगलं असतं. अशा वेळी संगीतानं तुमचा मेंदू तरतरीत होतो. दिवसभर काम केल्यानंतर सर्व ताण विसरण्यासाठी, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात वेगळेपण निश्चित करण्यासाठी एक ‘डीकप्रेशन रिच्युअल’ (Decompression Ritual) तयार करावी, असा सल्लाही सीन यांनी दिला आहे. आपण जिथं बसून गाणी ऐकणार आहोत, तिथं फर्निचर, लाईट्स वापरून कोझी वातावरण निर्माण करता येतं. जॅझ आणि शास्त्रीय संगीत हे शांत भाव निर्माण करण्यास मदत करतं. तर सकारात्मक आठवणींशी जोडलेल्या असतील तर इतर प्रकारही उत्तम परिणाम साध्य करू शकतात. संगीताचा संबंध भावनांशी असतो, त्यामुळं काही ठराविक प्रकारचं संगीत आपल्याला आपल्या आयुष्यातील आनंदी क्षणांची आठवण करून देतं, असंही सीन यांनी म्हटलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिंसमवेत संगीत ऐकल्यास त्याचा परिणाम अधिकच वाढतो. सोशल मीडियावर जेव्हा युजर्स आपली आवडती गाणी शेअर करतात तेव्हा तुम्हाला अगदी तुमच्या टीन एजमधील गाणी शेअर करायला संकोच बाळगू नका. तुमच्या भावनिक स्वास्थासाठी त्या आठवणी उत्तम असतील. हार्वर्डमध्ये (Harvard) संगीत आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधाचे विश्लेषण करणारे संशोधन 1994 आणि 1999 मध्ये करण्यात आले होते. चार चाचण्यांमध्ये संगीतोपचारानं नैराश्याची लक्षणं कमी झाल्याचे आढळले होते, मात्र पाचव्या चाचणीत कोणताही फायदा दिसून आला नाही. 2006 मध्ये तीव्र वेदनांना सामोरे जाणाऱ्या 60 वयस्क लोकांवर संगीतोपचाराचा प्रयोग करण्यात आला, त्यात या लोकांच्या वेदना, निराशा कमी झाल्याचं दिसून आलं. 2009 मध्ये करण्यात आलेल्या एका विश्लेषणात संगीत ऐकल्यानं रुग्णांना चांगली झोप लागत असल्याचं आणि झोपेतील व्यत्ययही कमी होत असल्याचं स्पष्ट झालं. बाख (Bach) प्रोझॅकची (Prozac)जागा घेऊ शकणार नाही, पण नैराश्याची (Depression) बाब असेल तेव्हा संगीताची एक धूनही मदतपूर्ण ठरू शकते. सध्याच्या कोविड 19 च्या महासाथीच्या काळात सर्वजण तणावातून जात असताना तणाव कमी करण्यासाठी संगीत नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Health, Singer

पुढील बातम्या