राशीभविष्य : वृषभ आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे शुभ

राशीभविष्य : वृषभ आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आहे शुभ

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो.

  • Share this:

मुंबई, 27 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहाच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दिवसातील येणारी आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना आपल्याला असेल तर त्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 27 मेचा दिवस कसा असेल.

मेष - प्रेमाचं उत्तर आज आपल्याला मिळेल पण पार्टनरच्या वागण्याचा त्रास होईल. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे.

वृषभ- आज कामाचा ठिकाणी कंटाळा येईल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील.

मिथुन- गुंतवणुकींच्या संधी सोडू नका. स्वप्नांच्या जगात हरवून जाल. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल.

कर्क- आज आपल्याला थकवा जाणवेल. वेळ विनामूल्य असला तरी मौल्यवान आहे. तो वाया घालवू नका प्रत्येक तासाचा सद्उपयोग करा. अपूर्ण कामं पूर्ण करण्यावर भर द्या.

सिंह - दीर्घ आजाराकडे दुर्लक्ष करू नका. गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा नफा मिळेल. योजना आखून दिवसाची सुरुवात करा.

कन्या- द्विधा मनस्थिती आणि समस्यांचा सामना आज आपल्याला करावा लागेल. बराच काळ अडकलेली नुकसान भरपाई आपल्याला मिळेल.

तुळ- गुंतवणूक करण्याआधी दोनवेळा विचार करा. सहकारी मदतीचा हात वाढवू शकतात, परंतु ते जास्त मदत करू शकणार नाहीत.

वृश्चिक- आरोग्याची समस्या उद्भवू नये म्हणून नियमित व्यायम करा. प्रिय व्यक्तीला विनाकरण बोलणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. सकारात्मक विचार करा.

धनु-येणारा वेळ हा आपल्यासाठी फार चांगला असणार आहे. भागीदारी व्यवसायात गुंतवणूक करू नका.

मकर- निर्णय घेण्याआधी सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. कर आणि विमा संबंधित विषयांकडे पाहण्याची गरज आहे. सुट्टीच्या काळातही कामाचा ताण असेल. कारण काम करून आपण आपला अनुभव आणखी वाढवू शकता.

कुंभ- सकारात्मक विचार करा. आपल्याला काळजी न करता आपल्या कुटुंबात आनंदाचे क्षण शोधण्याची आवश्यकता आहे. प्रिय व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मीन- आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे आपली मानसिक शांतता भंग होऊ शकते. मानसिक दबाव टाळण्यासाठी काहीतरी मनोरंजक आणि चांगले वाचा.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या