Home /News /lifestyle /

Gemology: हिरा नाहीये सर्वांसाठी! वापरण्याआधी ही बातमी वाचा अन्यथा...

Gemology: हिरा नाहीये सर्वांसाठी! वापरण्याआधी ही बातमी वाचा अन्यथा...

जीवनात प्रतिकूल परिणाम सातत्याने मिळत असतील तर अशा व्यक्तीला ज्योतिष अभ्यासक काही उपाय सुचवत असतात. रत्नं (Gems) वापरण्याचादेखील या उपायांमध्ये समावेश असतो.

    नवी दिल्ली, 10 मे : जीवनात यश मिळावं, सुख-समृद्धी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण परिश्रम करत असतो. परिश्रम घेऊनही अपेक्षित यश मिळत नसल्याने काही जण ज्योतिषशास्त्र (Jyotish Shastra) अभ्यासकांचा सल्ला घेतात. नवग्रह आणि राशींचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जीवनात प्रतिकूल परिणाम सातत्याने मिळत असतील तर अशा व्यक्तीला ज्योतिष अभ्यासक काही उपाय सुचवत असतात. रत्नं (Gems) वापरण्याचादेखील या उपायांमध्ये समावेश असतो. रास आणि कुंडलीतले ग्रह यांचा विचार करून ज्योतिष अभ्यासक योग्य रत्न सुचवत असतात. अलीकडच्या काळात योग्य सल्ला न घेता रत्न फॅशन (Fashion) म्हणून वापरली जातात. काही रत्नांचा फॅशन म्हणून केलेला वापर नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. हिरा (Diamond) आणि नीलम (Sapphire) ही रत्नं त्यापैकीच होत. आजकाल फॅशन स्टेटस म्हणून हिऱ्याची अंगठी, नेकलेस आदी आभूषणं वापरली जातात; पण हे रत्न लाभदायक ठरलं नाही तर संबंधित व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. हिऱ्याप्रमाणेच नीलम हे रत्न वापरण्यापूर्वी जाणकार किंवा अभ्यासू व्यक्तीचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण रत्नशास्त्रानुसार, (Gemology) हिरा आणि नीलम ही दोन रत्नं अशी आहेत, की ती वापरणारी व्यक्ती एक तर श्रीमंत होऊ शकते किंवा त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. कुंडलीतला शुक्र (Venus) आणि शनी (Saturn) या ग्रहांचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी अनुक्रमे हिरा आणि नीलम ही रत्नं वापरली जातात. डायमंड अर्थात हिरा हे शुक्राशी संबंधित रत्न आहे. हे रत्न धारण केल्यास जीवनात सुख-समृद्धी, पैसा प्राप्त होतो. तसंच या रत्नाचा परिणाम प्रेमजीवन किंवा वैवाहिक जीवनावरही दिसून येतो. सर्वांच हे रत्न फायदेशीर ठरत नाही. कमी वजनाचा हिरा धारण केल्यास फारसा परिणाम होत नाही. मोठ्या वजनाचा हिरा धारण करण्यापूर्वी निश्चित विचारविनिमय करणं आवश्यक आहे. हिरा हा केवळ वृषभ (Taurus) आणि तूळ (Libra) राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरतो. हे रत्न अशुभ ठरलं तर धनहानी, वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. याशिवाय मोठ्या दुर्घटना घडू शकतात किंवा मोठं नुकसान होऊ शकतं. हे ही वाचा-Numerology : जन्मतारखेनुसार 8 मेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? जाणून घ्या भविष्य नीलम हे शनीचं प्रमुख रत्न आहे. कुंडलीतल्या ग्रहस्थितीनुसार हे रत्न शुभ ठरलं तर ते वापरणारी व्यक्ती जीवनात मोठं यश संपादन करते; मात्र ज्या लोकांना हे रत्न लाभत नाही, अशा व्यक्ती अपयशी ठरतात. त्यांना मोठ्या दुर्घटनेचा, मानहानीचा किंवा कंगालपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्योतिष अभ्यासकांच्या सल्ल्यानं हे रत्न वापरावं. नीलम रत्न धारण करण्यापूर्वी म्हणजेच त्याची अंगठी (Ring) किंवा पेंडंट घालण्यापूर्वी एका निळ्या कापडात हे रत्न गुंडाळून झोपण्याच्या जागेखाली ठेवावं किंवा हातात बांधावं. या रत्नाचा परिणाम 24 तासांत दिसू लागतो. नीलम हे रत्न मकर, कुंभ, वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ राशीच्या व्यक्ती धारण करू शकतात. हिरा आणि नीलम ही दोन्ही रत्नं दिसायला अत्यंत सुंदर असतात. तसंच त्यांचे परिणामदेखील तितकेच तीव्र असतात. या रत्नांमुळे व्यक्तीच्या जीवनावर अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम दिसून येतात. त्यामुळे हिरा, नीलम ही रत्नं धारण करण्यापूर्वी ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. News18 लोकमत याची पुष्ठी करीत नाही.

    First published:

    Tags: Fashion

    पुढील बातम्या