Home /News /lifestyle /

तुम्हीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोलो-650 गोळी घेता? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच

तुम्हीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोलो-650 गोळी घेता? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच

हे औषध घेतल्यानंतर ते रुग्णांच्या मेंदूला पाठवलेले पॅन सिग्नल कमी करते, ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो. हे औषध घेतल्याने शरीरात उत्सर्जित होणाऱ्या केमिकल प्रोस्टॅग्लॅंडिनना (Prostaglandins) देखील प्रतिबंध होतो.

नवी दिल्ली 28 जानेवारी : गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीचा (Corona Pandemic) जगभर कहर सुरू आहे . कोविड-19 चे नवनवीन व्हेरिएंट (New variants) सतत समोर येत आहेत. कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये फक्त सर्दी, खोकला, ताप आणि फुफ्फुसात संसर्ग (lung infection) अशी लक्षणं दिसून येतात. आतापर्यंत कोरोनावर नेमका उपचार सापडलेला नाही, त्यामुळेच डॉक्टर आतापर्यंत केवळ कोरोनाच्या लक्षणांच्या (symptoms of corona) आधारे उपचार करत आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना अनेकजण सर्दी, ताप आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेताच थेट मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. डोलो-650 (Dolo 650) या औषधाच्या गोळीचादेखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. ताप, हात आणि पाय दुखणे कमी करण्यासाठी हे औषध वापरलं जातं. अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरतात. मात्र, इतर औषधांप्रमाणे डोलो-650 चे दुष्परिणाम (Side Effects) सुद्धा रुग्णांवर दिसू शकतात. त्यामुळे हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. माय उपचार, वेबएमडी अशा वैद्यकीय उपचारांबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइट्सवरील लेखांत याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे. फायदा कसला मग त्रासदायक ठरेल कोरफड; Aloe Vera चे साईड इफेक्टही जाणून घ्या डोलो-650 चा का वाढला वापर ? डोलो-650 च्या गोळीमध्ये पॅरासिटामॉल हे ड्रग असतं, जे ताप कमी करण्यास मदत करतं. कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप हेही एक प्रमुख लक्षण आहे. यासोबत डोलो-650 डोकेदुखी, दातदुखी, पाठदुखी, मज्जातंतू दुखणे, स्नायू दुखणे यांवरही आराम देते. त्यामुळेच हे औषध कोणताही विचार न करता, डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरले जात आहे. हे औषध घेतल्यानंतर ते रुग्णांच्या मेंदूला पाठवलेले पॅन सिग्नल कमी करते, ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो. हे औषध घेतल्याने शरीरात उत्सर्जित होणाऱ्या केमिकल प्रोस्टॅग्लॅंडिनना (Prostaglandins) देखील प्रतिबंध होतो. हे केमिकल शरीराचे तापमान, वेदना वाढवण्याचे काम करत असते. डोलो -650 गोळीमुळे होणारे दुष्परिणाम डोलो -650 या औषधाचे सेवन केल्याचे विविध दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने मळमळ होणे, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, जास्त झोप येणे, अस्वस्थ वाटणे, बद्धकोष्ठता, बेशुद्ध पडणे, तोंड कोरडे पडणे, युटीआय (UTI) आदींचा समावेश होते. याशिवाय हार्ट बीट स्लो होणे, व्होकल कॉर्ड्सना सूज येणे, फुफ्फुसांमध्ये संक्रमण, श्वास घेण्यास त्रास, मज्जासंस्था प्रभावित होणं, हृदयाचे ठोके वाढणं असे गंभीर दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात.

खतरनाक असला तरी Omicron चा फायदाही होतोय; ICMR ने दिला मोठा दिलासा

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा देशभर सुरू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढू लागली आहे. त्यातच सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची लक्षणं दिसताच अनेकजण कोरोना आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यापेक्षा थेट मेडिकलमध्ये जाऊन औषध घेण्यास प्राधान्य देतात. परंतु वैद्यकीय सल्लाशिवाय अशी औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.
First published:

Tags: Health Tips, Medicine

पुढील बातम्या