Home /News /lifestyle /

सावधान! तुम्हीही कच्चं दूध पिता का? तुम्हाला उद्भवू गंभीर आजारांचा धोका

सावधान! तुम्हीही कच्चं दूध पिता का? तुम्हाला उद्भवू गंभीर आजारांचा धोका

कच्चं दूध (raw milk) प्यायचंच असेल तर ते कसं प्यावं हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

    वॉशिंग्टन, 04 जुलै : दुधाला (milk) पूर्णान्न म्हटलं जातं. लहानपणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी दूध प्यावं असं सांगितलं जातं. काही जणांना दूध आवडत नाही तर काही जणांना खूप आवडतं. विशेषत: कित्येक जणांना तर कच्चं दूध (raw milk) प्यायला आवडतं. तुम्हालादेखील कच्चं दूध आवडतं का? तर सावध व्हा. कारण कच्च्या दुधामुळे गंभीर आजाारांचा धोका उद्भवू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कच्च्या दुधाचं सेवन गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतं. कच्चं दूध प्यायचंच असेल तर मग विशेष खबरदारी घ्यायला हवी. तरच हा आजाराचा धोका कमी करता येईल. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचं गायीचं कच्चं दूध आणि पाश्चराइझ्ड दुधाचे नमुने घेतले आणि त्यांची तपासणी केली. त्यावेळी संशोकांना दिसून आलं की  कच्च्या किंवा अनपाश्चराइझ्ड दुधात रूम टेम्परेचरमध्ये अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स जिन्स (antimicrobial-resistant genes) भरपूर प्रमाणात वाढतात आणि यामुळे गंभीर आजार बळावू शकतात.  जर्नल मायक्रोबिओममध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. पाश्चराइझ्ड दुधापेक्षा कच्च्या दुधात भरपूर प्रमाणात प्रोबायटिक्स किंवा चांगले बॅक्टेरिया (bacteria) असल्याचं सांगितलं जातं. मात्र संशोधकांना तसं काही दिसून आलं नाही. उलट त्यामध्ये बॅक्टेरिया रेजिस्टन्सना कारणीभूत ठरतील असे अँटिमायक्रोबिअल रेजिस्टन्स जिन्स विकसित होत असल्याचं दिसलं. हे वाचा - गरजेपेक्षा थोडं जरी मीठ जास्त खाल्लात तर होतील गंभीर दुष्परिणाम संशोधनाचे अभ्यासक जिनक्सिन लिऊ म्हणाले, "आम्हाला दोन आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या. एक म्हणजे कच्च्या दुधात आम्हाला आरोग्यासाठी चांगले असे बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात असल्याचं दिसून आलं नाही आणि जर तुम्ही कच्चं दूध रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं तर त्यामध्ये पाश्चराइझ्ड दुधापेक्षा अँटिबायोटिक रेजिस्टन्स जिन्स जास्त प्रमाणात तयार होतात" असं दूध प्यायल्याने या जिन्समुळेमुळे इतर बॅक्टेरियांमध्ये रेजिस्टन्सची क्षमता विकसित होऊ शकते. अँटिबायोटिक रेजिस्टन्स जिन्स असलेले बॅक्टेरिया रोगजंतूंपर्यंत पोहोचले तर ते सुपरबग म्हणजे अधिक धोकादायक होतील. त्यानंतर त्यामुळे होणारा संसर्ग किंवा आजारांवर कोणतंच औषध परिणामकारक ठरणार नाही. हे वाचा - गाय, म्हैस नव्हे तर गाढविणीच्या दुधापासून तयार केलं जातं जगातील सर्वात महाग चीझ यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, दरवर्षी जवळपास 3 दशलक्ष लोकांना अँटिबायोटिक रेजिस्टन्स इन्फेक्शन होतं आणि 35,000 पेक्षा अधिक लोकांचा यामुळे मृत्यू होतो. त्यामुळे तुम्हाला कच्चं दूध प्यायचं असेल तर आधी ते फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून त्यामध्ये अँटिबायोटिक रेजिस्टन्स जिन्ससह बॅक्टेरिया विकसित होण्याचा धोका कमी होईल, असा सल्लाही लिऊ यांनी दिला आहे. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Milk

    पुढील बातम्या