Home /News /lifestyle /

महागाईच्या काळात गृहिणींसाठी आनंदाची बातमी! खाद्य तेल इतक्या रुपयांनी झालं स्वस्त; टेन्शन कमी

महागाईच्या काळात गृहिणींसाठी आनंदाची बातमी! खाद्य तेल इतक्या रुपयांनी झालं स्वस्त; टेन्शन कमी

तेलांची एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) 10 ते 15 रुपये प्रतिलिटरने कमी झाली आहे, अन्न विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी ( 22 जून 22) ही माहिती दिली आहे.

  नवी दिल्ली, 23 जून:  सध्या वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्य बेजार झाले आहेत, त्यांचे घरचे बजेटच कोलमडून गेले आहे. तेलाच्या दरवाढीमुळे तर गृहिणींची तारेवरची कसरत सुरू आहे. मात्र, गृहिणींना दिलासा देणारी एक बातमी आहे. खाद्य तेल उत्पादन करणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी तेलाचे दर टप्प्याटप्प्याने कमी केले आहेत. तेलांची एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) 10 ते 15 रुपये प्रतिलिटरने कमी झाली आहे, अन्न विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी ( 22 जून 22) ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय दरांत झालेली कपात आणि सरकारच्या वेळीच हस्तक्षेपामुळे हे दर खाली येऊ लागले आहेत. नवीन एमआरपी असलेला स्टॉक लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे. खरं तर, खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prices) या आंतरराष्ट्रीय किमती तसेच देशांतर्गत उत्पादनांसह अनेक घटकांवर अवलंबून असतात. देशांतर्गत वापर आणि उत्पादन यांच्यातील फरक जास्त असल्याने भारताला मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करावं लागतं. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर काम केलं जात आहे. चेहऱ्यावरच्या केसांमुळे वैतागला आहात? 'हे' घरगुती उपायही ठरू शकतात प्रभावी
  देशांतील मोठ्या खाद्य तेल उत्पादक कंपन्या अदानी विल्मर आणि मदर डेअरी यांनी विविध प्रकारच्या खाद्यतेलांसाठी एमआरपी प्रतिलिटर 10-15 रुपयांनी कमी केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. यात शेंगदाणा तेल वगळता पॅकिंग केलेल्या खाद्यतेलाच्या सरासरी किरकोळ किमती, या महिन्याच्या सुरुवातीपासून कमी झाल्या आहेत आणि त्या 150 ते 190 रुपये प्रतिकिलोच्या श्रेणीत आहेत.
  दरम्यान, `अदानी विल्मार'ने शनिवारी आपल्या खाद्यतेलाच्या किमती या प्रतिलिटर 10 रुपयांनी कमी केल्या. `फॉर्च्युन रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल'च्या एक लिटर पॅकची एमआरपी ही 220 रुपये प्रतिलिटरवरून 210 रुपये केली आहे. `फॉर्च्युन' सोयाबीन आणि 'फॉर्च्युन' मोहरी तेलाच्या एक लिटर पॅकची एमआरपी ही 205 रुपये प्रतिलिटरवरून 195 रुपये झाली आहे. आकडेवारी काय सांगते: ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, 21 जून रोजी शेंगदाणा तेलाची (पॅक्ड) सरासरी किरकोळ किंमत 1 जून रोजी 186.43 रुपये प्रतिकिलो होती. तर मोहरीच्या तेलाचे भाव 1 जून रोजी 183.68 रुपये प्रतिकिलोवरून 21 जून रोजी 180.85 रुपये प्रति किलोवर आले आहेत. भाजीपाल्याचे दर मात्र 165 रुपये किलोवर कायम आहेत. दृष्टिक्षेपात दर - सोयाबिन तेलाचे दर 169.65 रुपयांवरून 167.67 रुपयांवर घसरले - सूर्यफूलचे दर 193 रुपयांवरून 189.99 रुपयांवर. - पाम तेलाचे दर 1 जून रोजी 156.52 रुपयांवरून 21 जून रोजी 152.52 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले. यामुळे गृहिणींना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
  First published:

  Tags: Lifestyle

  पुढील बातम्या