Home /News /lifestyle /

राशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा

राशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा

प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो.

    मुंबई, 04 मे: प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आजच्या दिवसात आपल्याला काय समस्या येणार आणि त्यांचा सामना कसा करायचा हे ठरवायचं असेल तर जाणून घ्या आजचं राशीभविष्य. मेष- सकारात्मक विचार करा. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस कठीण आहे. आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी न घडल्यास निराश होऊ नका. संवादातून आपल्याला नवीन गोष्टी कळतील. वृषभ- मिळवलेला पैसा आज हातात राहणार नाही. व्यवसायामध्ये नव्या संधी मिळतील. इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल. प्रयत्न केला तर आजचा दिवस खूप चांगला जाईल मिथुन- आरोग्य चांगलं राहिल पण घाईगडबडीनं गुंतवणूक करू नका. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायाच्या दृष्टीनं आजचा दिवस सकारात्मक असेल. कर्क- आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळेल. आर्थिक गुंतवणूक करण्याकडे भर द्या. नोकरीत बदल केल्यास मानसिक समाधान मिळेल. सिंह - नियमित व्यायमानं आपलं आरोग्य चांगलं राहिल.गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे, परंतु केवळ योग्य सल्ल्यानेच गुंतवणूक करा. अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतीलच असं नाही. कन्या- विश्रांती घेणं महत्त्वपूर्ण ठरेल. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करा. अनावश्यक गोष्टींमध्ये खर्च टाळा. मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा आजचा दिवस चांगला आहे. तुळ- उशिरापर्यंत काम करणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा. प्रेमाच्या बाबतील थोडा वेळ घ्या आणि मग निर्णय घ्या. कामावर लक्ष केंद्रीत करा. वृश्चिक- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज विश्रांती घेणं आवश्यक आहे. प्रेम प्रकरणांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. पार्टनरमुळे आज मानसिक त्रास होऊ शकतो. धनु- आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीचा मूड सातत्यानं बदलणारा असेल. बर्‍याच जुन्या आठवणी ताज्या होतील. मकर- खर्च आणि उत्पन्न यातील समतोल राखायला हवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा आपल्याला आनंद मिळेल. जुन्या घडून गेलेल्या गोष्टी उगाळत बसू नका. कुंभ- आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे आज फायदा होऊ शकतो. प्रिय व्यक्तीच्या आवडीनिवडीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपला सन्मान दुखावला जाईल. मीन- तज्ज्ञांच्या सल्लाविना गुंतवणूक करू नका. कोणत्याही कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करणं धोक्याचं ठरेल. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या