Home /News /lifestyle /

राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवा

मेष आणि मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस वाचा सविस्तर आजचं राशीभविष्य

    मुंबई, 04 जानेवारी : कोरोनाच्या दोन लशींना भारतात सशर्त आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात ही आनंदाची बातमी समोर येत असताना आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल? प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- आपल्या शंकेखोर वृत्तीमुळे आपल्याला त्रास होईल. भांडणामुळे आज आपल्याला मनस्ताप सहन करावा लागू शकतो. वृषभ- चांगल्या परिणामांसाठी स्वत:ला प्रत्यासहन द्या. मिथुन- रिफ्रेश होण्यासाठी आपण विश्रांती घेणं गरजेचं आहे. घरगुती कामांमध्ये आपण व्यस्त राहाल. नवीन गोष्टी करण्यासाठी आज आपला दिवस चांगला आहे. कर्क- मानसिक ताण येईल आज आपल्याला चुकीची माहिती मिळू शकते. आज आपल्याला उत्तम सहकार्य मिळेल. सिंह- जास्त विचारांनी मेंदू थकेल. ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. पैसे खर्च करू नका. आज आपल्या मनानुसार सगळ्या गोष्टी होणार नाहीत. हे वाचा-अरे देवा! कोरोना व्हायरसबाबत चीनमधून आली नवी बातमी; उडाली खळबळ कन्या- मित्र आणि जोडीदार आपल्यासाठी शांतता आणि आनंद आणतील. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. तुळ- प्रवास करणं टाळा, आज प्रवासातून थकवा जाणवू शकतो त्यामुळे प्रवास करू नका. घाईत निर्णय घेऊ नका. आपल्या जोडीदाराच्या कामात जास्त हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. वृश्चिक- सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज आपल्याला फायदा होईल. आज आपल्या महत्त्वाचे निर्णय आणि गोष्टी करण्यासाठी आवश्यक दिवस आहे. धनु- आज आपला मूड खराब होऊ शकतो आज आपल्याला पश्चाताप होईल. आज आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल. मकर - आज आर्थिक व्यवहारात अडकू नका. घरगुती बाबींकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. आज समस्यांचा सामना करावा लागेल. कुंभ- विचार करा कोणत्याही निर्णयापर्यंत तातडीनं पोहोचू नका. आज आपल्या खर्चात वाढ होईल. मीन- आज आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल. आजचा दिवस फायद्याचा ठरू शकतो.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या