राशीभविष्य : मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना काम आणि प्रवास थकवा देणारा असेल

राशीभविष्य : मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना काम आणि प्रवास थकवा देणारा असेल

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आज कामाचा ताण असल्यानं आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. गुंतवणुकीचे निर्णय उद्यावर सोडा.

वृषभ- आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ न दिल्यानं राग येऊ शकतो. मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे.

मिथुन- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या बॉसचा मूड खूप चांगला असेल आणि त्यामुळे काम चांगलं होईल.

कर्क- आर्थिक सुधारणा निश्चित आहे. नातेवाईकांना भेटू शकता.

सिंह- आज आपल्या धाडसाची परीक्षा असेल. दीर्घ आजारापासून मुक्ती मिळेल. भूतकाळातील घटनांचा उल्लेख टाळा.

हे वाचा-व्यायामानंतर श्वास घ्यायला त्रास म्हणजे अस्थमा असतो का?

कन्या- आर्थिक सुधारणा निश्चित आहे. सोशल मीडिया वापरणे आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकते.

तुळ- कितीही कठीण प्रसंग आला तरी निराश होऊ नका. बँकेच्या व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगा. बेफिकीर वागण्यामुळे आज आपली चिडचिड होऊ शकते.

वृश्चिक- आज कामाचे ओझे थोडा ताण आणि राग आणू शकतात. आर्थिक बाबतीत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

धनु- ओळखीच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. समस्यांकडे काही वेळासाठी दुर्लक्ष करा.

मकर - प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यास आज आपल्याला आराम वाटेल. पैसे जपून खर्च करा म्हणजे पश्चितापाची वेळ येणार नाही.

कुंभ- एकतर्फी प्रेमातून आज आपल्याला त्रास होऊ शकतो. आज प्रवास केल्यास आपल्याला थकवा जाणवेल.

मीन- आज आपल्याला भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 8, 2020, 7:26 AM IST

ताज्या बातम्या