राशीभविष्य : वृश्चिक आणि कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जाणवेल

राशीभविष्य : वृश्चिक आणि कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जाणवेल

कोणत्या राशीसाठी आजचा शुभ दिवस आणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवा.

वृषभ- खर्च वाढवणं टाळा. आज आपल्याकडे येणारी कामं थोडा ताण आणि थकवा देणारी असतील. प्रेमासाठी आज आपल्याकडे भरपूर वेळ असेल.

मिथुन- आशावादी राहायला हवं. त्यामुळे मनातील नकारात्मक भावना कमी होईल. आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय वेळ घालविण्यात तुम्हाला अडचण येईल. आपल्या वरिष्ठांकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क- आज आपला दिवस संमिश्र असेल. भावनिक व्हाल त्यामुळे बोलताना किंवा निर्णय़ घेताना विचार करा. जमीन आणि रिअल इस्टेटमध्ये आज आपण पैसे गुंतवू शकता.

हे वाचा-फीऐवजी गुरुदक्षिणा म्हणून श्रीफळ; नारळ देऊन विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षण

सिंह- मनात राग ठेवून वागू नका. आकर्षक ऑफरला भुलून जाऊ नका त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.

कन्या- कामाचा ताण असला तरी आरोग्य चांगलं राहिल. अचानक नफा मिळेल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

तुळ- आज आपल्याला स्वत:साठी पुरेसा वेळ मिळेल. संधीचा फायदा घ्या आणि चांगल्या आरोग्यासाठी फिरा. आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टिकोनातून खूप विवादास्पद असेल.

वृश्चिक- कामाचा ताण खूप जास्त आज असणार आहे. आज अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो.

धनु- महत्त्वपूर्ण लोकांशी संवाद साधताना आपले शब्द काळजीपूर्वक निवडा.

मकर - काम आवरण्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रवास टाळणं आज गरजेचं आहे.

कुंभ- जुने मित्र भेटल्यानं आनंद मिळेल. कामाच्या दबावामुळे मानसिक त्रास आणि समस्या उद्भवू शकतात. आज आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी होणार नाहीत.

मीन- जोडीदार रागवलेला असेल. कोणताही निर्णय घेण्याआधी दोन वेळा विचार करा.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 7:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading