मुंबई, 05 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- सकारात्मक विचारांनी आपल्या समस्या सोडवण्यास मदत होईल. खर्चामुळे आर्थिक भार वाढू शकतो.
वृषभ- पेराल तसे उगवेल या म्हणीचा अर्थ समजून आज आपल्याला वागलं पाहिजे. मित्रांसोबत वेळ घालवा.
मिथुन- सकारात्मक राहा, आजचा दिवस आपला खूप छान असेल. प्रिय व्यक्तीची आठवण येईल.
कर्क- डोळ्यांची आज विशेष काळजी घ्या. आर्थिक योजनांमध्ये पैसे अडकवू नका. ज्येष्ठ अथवा वडिलधाऱ्यांचा सल्ला आवश्यक आहे.
सिंह- जोडीदाराच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या- गुंतवणूक करताना सर्व माहिती वाचा. आजचा दिवस फायदा मिळवून देणारा असेल. पण म्हणून गडबडीनं निर्णय घ्यायला जाऊ नका.
तुळ- आज आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. वचन देण्याआधी नक्की विचार करा.
वृश्चिक- सकारात्मक विचारांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. बेजबाबदारपणा त्रासदायक ठरेल.
हे वाचा-न्यूझीलंडमध्ये मंत्री प्रियांका राधाकृष्णन यांना अमूल गर्लने दिल्या शुभेच्छा
धनु- घाईघाईने निर्णय घेऊ नका. राग म्हणजे क्षुल्लक वेडेपणा आहे हे समजून घेण्याची ही वेळ आहे आणि यामुळे आपणास हानी पोहोचवू शकते.
मकर - प्रिय व्यक्तीसोबत आज आपला वेळ खूप छान जाईल.
कुंभ- भविष्यातील योजनांचं नियोजन करा.जोडीदाराशी संवाद स्थापित करणे फार कठीण आहे. पार्टनरकडून आपल्याला आज सरप्राइज मिळू शकते.
मीन-आज आपल्या कामात अडथळे येऊ शकतात. आपल्या प्रिय व्यक्तीचे स्मरण करणे अधिक चांगले आहे.