राशीभविष्य : मकर आणि मीन राशीच्या व्यक्तींना धैर्य आणि संघर्षानंतर आज मिळणार यश

राशीभविष्य : मकर आणि मीन राशीच्या व्यक्तींना धैर्य आणि संघर्षानंतर आज मिळणार यश

मेष आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. काहीवेळा या आव्हानांची पूर्वकल्पना असेल तर आपण त्यासाठी मानसिक तयारी देखील करतो. त्यासाठी जाणून घ्या कसा असेल 12 राशींसाठी आजचा दिवस.

मेष- आज आपल्या मोकळ्या वेळेचा आनंद घेऊ शकता. आर्थिक स्थिती सुधारल्यानं आपली अडलेली कामं पूर्ण करू शकता.

वृषभ- मानसिक शांततेसाठी देवाचं नामस्मरण करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. जोडीदार आज आपली खूप काळजी घेईल.

मिथुन- आर्थिक अडचणींमुळे आज आपण वादात अडकू शकता. कामाच्या ठिकाणी आजचा आपला दिवस थोडा त्रासदायी असेल. प्रवासातून फायदा होईल.

कर्क- ब्लड प्रेशरच्या रुग्णांना विशेष काळजी आणि औषधाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज आपण खूप पैसे कमावू शकता. आराम करण्यासाठी आपल्याकडे कमी वेळ असेल.

सिंह- राग आणि चिडचिडेपणाच्या भावनेवर नियंत्रण मिळवा. प्रेमासाठी आजचा दिवस खूप कठीण आहे.

हे वाचा-मुंबईकरांनो...विनामास्क फिरताना सापडल्यावरही मिळणार एक दिलासा!

कन्या- समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मित्रांची मदत घ्या. प्रिय व्यक्तीची आठवण येईल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.

तुळ- दात आणि पोट दुखण्याची समस्या आज आपल्याला जाणवू शकते. आपल्या योजनांमध्ये अनेक अडथळे येतील. रागात निर्णय घेणं वाईट आहे.

वृश्चिक- गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला नाही. आपल्यामुळे कुणी आज दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या.

धनु- आज आपण विश्रांती घ्यायला हवी. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मकर - आज आपले खर्च वाढल्यानं अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागेल.

कुंभ- भीती आणि चिडचिडेपणामुळे आरोग्य बिघडू शकतं. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक सुधारणांमुळे आपण बर्‍याच काळासाठी प्रलंबित बिले आणि कर्ज सहजपणे परतफेड करू शकाल.

मीन-प्रिय व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका. आपल्या क्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत करा.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 30, 2020, 7:12 AM IST

ताज्या बातम्या