मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

राशीभविष्य : धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस कोणत्या राशीला करावा लागेल आव्हानांचा सामना.

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस कोणत्या राशीला करावा लागेल आव्हानांचा सामना.

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस कोणत्या राशीला करावा लागेल आव्हानांचा सामना.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 27 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना असेल तर त्यावर तोडगा काढणं किंवा या समस्यां येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात त्यासाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

मेष- आरोग्य पूर्णपणे चांगलं राहिल. घराच्या वातावरणामुळे तुम्ही निराश होऊ शकता.बर्‍याच जुन्या मित्रांना भेटू शकता.

वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. भविष्यातील योजनांचा विचार करा.

मिथुन- एकटेपणाची भावना खूप वाईट आहे. वाई सवयी सोडण्याची ही चांगली वेळ आहे. आज आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागेल.

कर्क- उशिरापर्यंत आपल्याकडे काम असेल. अनपेक्षितपणे खर्चाचा ताण येईल. आजचा दिवस असा आहे की जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी होणार नाहीत.

सिंह- वेगानं गाडी चालवणं आज आपल्यासाठी धोकादायक असेल. आर्थिक नफा मिळेल, अडचणींवर मात करण्यात यश मिळेल.

हे वाचा-कुछ तो गडबड है दया! सेलिब्रिटींचे मालदीवमधील फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा

कन्या- आज आपल्याला आलेला ताण दूर करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.

तुळ- आपल्या वागणुकीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घ्याल. देवाण-घेवाण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टीने धावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक- आज आपल्याला डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे. बोलताना शब्द जपून वापरा. आज आपला वेळ वाया घालवू नका.

धनु- योजना आखणं वाईट नाही. प्रिय व्यक्तींसोबत आज आपला वेळ खूप चांगला जाईल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.

मकर - नशिबावर अवलंबून राहू नका, कठोर परिश्रम घ्या. घाईगडबडीत कोणताही निर्णय आणि गुंतवणूक करू नका.

कुंभ- आर्थिक समस्यांचा सामना आज आपल्याला करावा लागेल. वाईट वागण्याचा नकारात्मक प्रभाव पडेल ज्यामुळे आपला तोटा होऊ शकतो.

मीन- आज आपण विश्रांती घेणं गरजेचं आहे. आज अचानक आपल्याला धनलाभ होईल. निराश असलेला मूड वादाचे कारण बनू शकतो.

First published:

Tags: Astrology and horoscope