राशीभविष्य : मकर आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घाईत निर्णय घेणं धोक्याचं

राशीभविष्य : मकर आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी घाईत निर्णय घेणं धोक्याचं

वृषभ आणि तुळ राशीच्या व्यक्तींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार वाचा आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : येणाऱ्या दिवसातील आव्हानांची चाहूल आपल्याला आधीच लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं. कसा असेल 12 राशींसाठी आजचा दिवस जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष- क्षणिक रागामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला नाही.

वृषभ- व्यस्त कामाचा आपल्या आरोग्यावर ताण पडेल.

मिथुन- वेळेवर वेगानं पावलं उचलणं गरजेचं आहे. सहकाऱ्यांच्या मदतीनं आपला दिवस चांगला जाईल. जुन्या घटनांमुळे जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

कर्क- आरोग्य आणि जीवनाकडे दुर्लक्ष करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही.

सिंह- आज आपल्याला प्रेरणा मिळू शकते. गुंतवणूक करण्याआधी योग्य नियोजन आणि विचार करा.

कन्या- कामाच्या ठिकाणी आज अनेक वाद होतील. आज आपली कामं अधिक आणि वेळ कमी अशी अवस्था होऊ शकते. पार्टनरसोबत झालेले गैरसमज दूर करा.

तुळ- आत्मविश्वास आणि संयम बाळगा. आपल्याला मेहनतीचं योग्यवेळी फळ मिळेल फक्त परिश्रम करत राहा.

हे वाचा-क्या बात है! या अनोळखी ठुमक्यांचे 2 कोटी दिवाने, लग्नातला डान्स झाला VIRAL

वृश्चिक- आज कोणतीही कृती करण्याआधी विचार करा. आर्थिक अडचणींमुळे आपण अडकण्याची शक्यता आहे. विश्रांतीसाठी आज आपल्याला पुरेसा वेळ मिळणार नाही.

धनु- धीरानं घ्या गडबड करून साध्य काहीच होत नाही. समजूदारपणा आपल्या प्रयत्नांना नक्की यश आणेल. कामाचा ताण घरी आणू नका. आज नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

मकर - घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. आज आपल्याला खूप जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

कुंभ- अति ताण आणि चिंता आपलं आरोग्य बिघडवण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाऴा. स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करण्यास सुरुवात करा.

मीन- आज आपल्या आरोग्याची काळजी घ्या आजारी पडण्याची शक्यता आहे. आज आपल्याला कंटाळा येईल. आज सुस्तपणा वाटेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 24, 2020, 7:23 AM IST

ताज्या बातम्या