मुंबई, 23 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वृषभ- आपला आत्मविश्वास वाढवा. आज आपल्या प्रिय व्यक्तीचा आपल्यावर राग असेल.
मिथुन- भांडणामुळे आपला मूड खराब होऊ शकतो. आज वादविवाद शक्यतो टाळा.
कर्क- आर्थिक समस्यांमुळे आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल.
सिंह- आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. आज आपल्याला चांगली बातमी मिळू शकते.
कन्या- कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.
हे वाचा-मॅनेजरने 'रिसेप्शनिस्ट' होऊन तरुणाचा घेतला Interview; आयुष्याचा मिळाला धडा
तुळ- कामाच्या ठिकाणी दबाव वाढल्यानं तणाव येईल. ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. आज आपली एकाग्रता भंग होईल.
वृश्चिक- आज आपण विश्रांती घ्याल. आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा. गुंतवणुकीत खूप सावधगिरी बाळगा.
धनु- आरोग्याची काळजी घ्या. करमणुकीच्या साधनांवर जास्त खर्च करू नका. आपले पाय खेचणाऱ्यांपासून सावध राहा.
मकर - आपल्या क्षमता ओळखा, आर्थिक फायदा पुढे ढकलला जाऊ शकतो.
कुंभ- आजचा दिवस आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाईल. सुट्टी संपली यापेक्षा आलेला दिवस कसा चांगला जाईल यावर विचार करा.
मीन- आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करु नका. हट्टी वागणे टाळा.