राशीभविष्य: वृषभ आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज होऊ शकतो फायदा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- आर्थिक गोष्टीत काळजी घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील समस्या आज आपल्या तणावाचं कारण असू शकतात. वृषभ- आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आपले डोळे खराब होणार नाहीत याकडे लक्ष द्या. मिथुन- आर्थिक समस्या आज आपल्याला त्रास देऊ शकतात. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची कसून चौकशी करा. कुठेतरी बाहेर जाण्याची योजना असेल तर ती शेवटच्या क्षणापर्यंत बदल होऊ शकतात. कर्क-सकारात्मक विचारांना मनात थरा द्या. खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. सिंह- आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. नवीन कल्पना फायद्याच्या ठरतील. हे वाचा-Google, FB, Twitter चा इम्रान खान यांना निर्वाणीचा इशारा; कायदा बदलला नाहीत तर.. कन्या- ताण घालवण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा. आपलं मन शांत आणि स्थिर राहिल यासाठी प्रयत्न करा. तुळ- आळशी आणि निराश वृत्तीमुळे बरेच वाद होतील. गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. वृश्चिक- आज आपल्याला आर्थिक फायदा होईल. आपण काळजी करण्याची गरज नाही. कामासाठी केलेले प्रवास फायदा मिळवून देतील. धनु- आनंदी राहा आपली चांगली वेळ येत आहे. आज आपण खूप ऊर्जावान असाल. प्रेमातून समाधान मिळेल. मकर - हार मानू नका आणि निराश हताश होऊ नका. कठोर परिश्रम करा, घाईत गुंतवणूक करु नका. कुंभ- आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाईट वागणुकीचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. मीन-आज विश्रांती घ्या आज आपल्याला आरामाची गरज आहे. आपल्या जोडीदारासमवेत सुखद वेळ घालवण्याची संधी मिळेल.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: