राशीभविष्य : तुळ आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रवास आणि कामात सतर्क राहा

राशीभविष्य : तुळ आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रवास आणि कामात सतर्क राहा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- घाईघाईत गुंतवणूक करू नका. आज नवीन योजना तयार कराल. आज आपल्या प्रिय व्यक्तीची आवड जपा.

वृषभ- आज आपलं आरोग्य चांगलं राहिल. आपला आनंद आत्मविश्वास वाढवेल. आर्थिक सुधारण निश्चित आहे.

मिथुन- आज आपल्यावर आर्थिक भार पडेल. जोडीदाराला इमोशनल ब्लॅकमेल करणं टाळा. आरोग्याच्या दृष्टीने धावणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

कर्क- नवीन जोखमीचं काम करणं टाळा, नवीन व्यवसाय किंवा भागीदारी करण्याची रिस्क घेऊ नका. आरोग्य आणि आपल्या जोडीदाराची मनःस्थिती आपल्या दिवसावर नकारात्मक परिणाम करू शकते.

सिंह- कामाच्या ठिकाणी सतर्क राहाणं खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रवास करत असल्यास, सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे ठेवण्यास विसरू नका.

हे वाचा-Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार

कन्या- स्वार्थी लोकांपासून दूर राहा. आज आपल्यावर खूप ताण येऊ शकतो. अपेक्षेनुसार गोष्टी घडल्या नाहीत तर ताण येऊ शकतो.

तुळ- भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगलं राहिल यासाठी प्रयत्न करा. आज आपल्या जोडीदाराला आत्मविश्वास द्या.

वृश्चिक- स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रागावार नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

धनु- भावनांवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.

मकर - रागावर नियंत्रण ठेवायला हवं, गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कुंभ- गोष्टी मनानुसार झाल्या नाहीत तर खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल.

मीन- निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 21, 2020, 7:16 AM IST

ताज्या बातम्या