राशीभविष्य : मेष आणि धनु राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवायला हवं

राशीभविष्य : मेष आणि धनु राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवायला हवं

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो त्यामुळे दिवस कसा असेल कोणती आव्हानं असतील आणि कोणते शुभ संकेत असतील याची पूर्व कल्पना मिळाली तर अडचणींवर मात करणं अधिक सोपं जातं यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- रागावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकतं. आज आपल्या हातात पैसा उरणार नाही.

वृषभ- गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. तुमच्या मनात कामाचा दबाव असूनही, तुमचा प्रिय मित्र तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येईल

मिथुन- आज खूप तणाव येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस प्रेमानं भरलेला असेल. आपल्या सहकार्यामुळे कौतुक केलं जाईल. नियोजित कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.

कर्क- खर्चात वाढ होईल. कामावर आणि घरात दबाव असल्यानं आज आपल्याला राग येऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचा-पॅरिसमध्ये महिलांना नोकरीवर ठेवल्याचा मोठा फटका; 80 लाखांचा ठोठावला दंड

सिंह- आज कामाचा ताण असला तरी आपली ऊर्जा चांगली असेल. ज्यादाचे खर्च शक्यतो टाळा. कोणी आपला गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

कन्या- गुंतवणुकीतून आज आपल्याला फायदा होईल. अनावश्यक वादविवाद टाळा. प्रेमात आपण जरा जपून पावलं उचलणं आवश्यक आहे. कठोर परिश्रम करा आणि संयम बाळगा.

तुळ- क्षणिक प्रेरणेतून कोणताही निर्णय घेऊ नका. आज आपल्याला कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल.

वृश्चिक- खर्चाचा ताण आज आपल्यावर येईल. आज आपल्या आनंदावर विरजण पडू शकतं.

धनु- आरोग्य सुधारेल त्यासाठी आवश्यक ती पथ्य पाळणं गरजेचं आहे. आपल्या रागावर, ताणावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. वेळेचं योग्य नियोजन करा.

मकर - आज आपल्याला आरामासाठी वेळ मिळू शकतो. आपल्या इच्छा पूर्ण होतील.

कुंभ- खर्चात वाढ होत असल्यानं बचत करणं कठीण जाईल. कामाचा आज आपल्यावर जास्त ताण असेल.

मीन-मानसिक गोंधळ आणि निराशा टाळण्यासाठी प्रयत्न करा. संयम राखा आणि नियोजन करून नीट निर्णय घ्या. आर्थिक नफा मिळेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 21, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या