राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना हवी आहे मानसिक शांतता

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना हवी आहे मानसिक शांतता

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- काम आणि व्यावसायाच्या ठिकाणी आज आपल्याला फायदा होईल. आपले संबंध आणि संपर्क सुधारतील.

वृषभ- जोडीदारामुळे आज अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. संयम राखणं गरजेचं आहे.

मिथुन- आपण एक मोठा व्यवसाय व्यवहार करू शकता. आपल्याला मानसिक शांतता खूप महत्वाची आहे.

कर्क- पैशांची चणचण ही आपल्या समस्येचं मूळ कारण असू शकते. आज आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहिल याकडे लक्ष द्या.

सिंह- कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करून घ्या. आज दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

हे वाचा-कोरोनाव्हायरसपेक्षाही भयंकर chapare virus; वेळीच ओळखा लक्षणं

कन्या- बसता-उठताना आज आपल्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या.

तुळ- समोरच्या व्यक्तीच्या काळीपूर्वक ऐका. त्यातून आपल्याला परिस्थितीवर योग्य तो तोडगा काढता येईल.

वृश्चिक- आज आपला संपूर्ण दिवस खूप धावपळीचा जाईल. आज अडचणींचा सामना देखील करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीनं धावणं फायद्याचं ठरेल.

धनु- आज आपल्याला विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. शरीर थकल्यानं विचार करण्याची क्षमता कमी होते.

मकर - तळलेल्या गोष्टी खाऊ नका. आज आपण इतरांवर अधिक खर्च करू शकता.

कुंभ- प्रवास तुम्हाला थकवा आणि तणाव देईल. आज आपली निराशा होऊ शकते.

मीन-आपल्याला बर्‍याच काळापासून जाणवत असलेल्या थकवा आणि तणावातून आराम मिळेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 20, 2020, 7:16 AM IST

ताज्या बातम्या