राशीभविष्य : धनु आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी आज प्रवास टाळा

राशीभविष्य : धनु आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी आज प्रवास टाळा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- मित्रांसोबत घालवलेला संध्याकाळचा वेळ खूप छान जाईल. अति खाण्यामुळे आपली प्रकृती खराब होऊ शकते. अडथळ्यांना तोंड देण्यासाठी आनंदी आणि तयार रहा.

वृषभ- पोटाचे विकार असणाऱ्या रुग्णांनी दिवाळीच्या दिवसात अधिक काळजी घ्यायला हवी. विश्रांतीसाठी फार कमी वेळ मिळेल.

मिथुन- वेळ वाया घालवू नका कारण त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. येणाऱ्या समस्या शांतपणे सोडवणं गरजेचं आहे. भागीदारीचा व्यवसाय सुरू करण्यास टाळा.

कर्क- मानसिक ताण आणि कौटुंबिक जबाबदारी वाढेल. प्रेमात आज अनेक कठीण प्रसंग येऊ शकतात. आपल्या कामात अडथळे आणणाऱ्यांसोबत संपर्कात राहू नका.

हे वाचा-IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे माईंड गेम सुरू, स्मिथचा टीम इंडियाला इशारा

सिंह- आज आपल्याकडे पुरेसा वेळ आहे त्याचा योग्य वापर करा. आलेल्या संधीचा योग्य फायदा घ्या.

कन्या- रागाची भावना खूप घातक आहे. आर्थिक व्यवहारापासून आज दूर राहाणं योग्यच. प्रवासासाठी दिवस चांगला नाही.

तुळ- खाण्या-पिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतोच. प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे आपल्यासाठी खूप कठीण आहे.

वृश्चिक- अनेक कामं अर्धवट राहू शकतात. जोडीदार दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या.

धनु- बाहेर खाणं टाळा. तसेच आपल्या सवयींवर विशेष लक्ष ठेवा. प्रवास फायदेशीर पण महाग असल्याचे सिद्ध होईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मकर - आरोग्याच्या बाबतील आजचा दिवस चांगला नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

कुंभ- करमणुकीवर जास्त खर्च करू नका. आज आपली चिडचिड होऊ शकते.

मीन- तणाव टाळण्यासाठी वाद आणि मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. आपला दृष्टीकोन आपल्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण करू शकतो.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 15, 2020, 7:18 AM IST

ताज्या बातम्या