राशीभविष्य : मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आज आपला काहीसा मूड खराब असू शकतो. समस्या आणि नकारात्मक विचारांचा आपल्यावर प्रभाव पडेल.

वृषभ- घाईगडबडीत घेतलेला निर्णय आपल्याला त्रासदायक ठरेल. आज आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. व्यवसायिकांसाठी चांगला दिवस आहे.

मिथुन- आजच्या गोष्टींचा परिणाम आपल्याला दीर्घपणे जाणवतील. आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कर्क- पायऱ्या चढताना आज विशेष काळजी घ्या. आज आपल्याला धाप लागू शकते त्यामुळे श्वसनाचे आजार होणार नाहीत याची काळजी घ्या.

सिंह- ध्यान आणि योगचा आपल्याला खूप जास्त फायदा होईल. अनौपचारीक भेटीगाठी होतील.

हे वाचा-महाराष्ट्रासह आता छोट्या राज्यात कोरोनाचा मोठा धोका; 7 राज्यांनी वाढवली चिंता

कन्या- कामाचा ताण आपल्यावर खूप जास्त होईल. अचानक होणाऱ्या खर्चामुळे ताण वाढेल. प्रिय व्यक्तीला आज आपल्यामुळे त्रास होऊ शकतो.

तुळ- कामाच्या ठिकाणी नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आज आपण शांततेची भूमिका घेणं खूप महत्त्वाचं आहे.

वृश्चिक- कामाचा ताण आल्यानं तब्येत बिघडू शकते. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. एकटेपणाची भावना खूप कठीण आहे.

धनु- आज आपली मानसिक शांतता भंग होऊ देऊ नका. सोशल मीडियावर वेळ घालवणं शरीर आणि मनासाठी देखील फायद्याचं नाही.

मकर - एखाद्याशी पटकन मैत्री कऱण्याचा स्वभाव धोकादायक ठरू शकेल.

कुंभ- आज आपल्याला विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे. प्रवासातून थकवा जाणवेल.

मीन- गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. एकतर्फी प्रेमातून आपलं नुकसान होईल.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2020, 7:13 AM IST

ताज्या बातम्या