Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज प्रेमात येतील अडथळे

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज प्रेमात येतील अडथळे

मेष ते मीन 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या.

    मुंबई, 04 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. येणाऱ्या अडचणींची चाहूल लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- व्यायामानं आपल्या दिवसाची सुरुवात करा. आज आपल्याला कामाच्या ठिकाणी चांगली ऑफर मिळू शकते. वृषभ- खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपलं स्तुती आणि कौतुक केलं जाईल. जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात. मिथुन- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रिय व्यक्तीसोबत बोलणं अवघड होईल. वेळेचा योग्य वापर करा. कर्क- आज आपल्याला आरामाची आवश्यकता आहे. प्रिय व्यक्ती आज आपल्यावर रागवेल. आज इतरांची मत काळजीपूर्वक ऐका. हे  वाचा-लोक निवृत्त होतात त्या वयात सुरू केली कंपनी, 90 व्या वर्षीही सांभळतात व्यवसाय सिंह- आपल्या कुटुंबाच्या भावना समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. आज आपल्याला जास्त ताण येण्याची शक्यता आहे. कन्या- आज आपण कोणत्याही गोष्टीसाठी निराश होऊ नका. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा. तुळ- आज आपल्याला उत्तम प्रोत्साहन मिळू शकतं. भावनिक निर्णय घेताना आपली विवेकबुद्धी सोडू नका. वृश्चिक- आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही. आज आपण खूप संयमी आणि शांत रहायला हवं. धनु- दीर्घ काळापासून सुरू असेलेल्या आजारापासून आपली सुटका होईल. आज पैसे मिळवण्याच्या संधी चालून येतील. प्रेमासाठी दिवस चांगला आहे. मकर - आज विश्रांती घेणं खूप आवश्यक आहे. मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील.गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. कुंभ- दिवस खूप फायदेशीर नाही. प्रवास करणं आज सोयीचं ठरेल. मीन-खोटे बोलणे टाळा कारण यामुळे तुमचे प्रेमसंबंध खराब होऊ शकतात. क्षमता सुधारण्याचा प्रयत्न करा आणि इतरांपेक्षा चांगले व्हा.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या