सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुम्ही आतापर्यंत ज्या ऐहिक गोष्टी मिळवल्या आहेत, त्यावर तुमचं यश मोजलं जात असेल; मात्र आता नवा धडा शिकणं गरजेचं आहे. तुमच्या एकंदर रेसिडेन्शियल सिक्युरिटीबद्दल एखादी बाहेरची व्यक्ती तुम्हाला आश्चर्य वाटायला लावेल. तुमच्या सकाळच्या रूटीनमध्ये बदल करणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN - A carnelian
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्हाला नव्या जबाबदारीचं गांभीर्य समजलं नसेल, तर आता त्याचे खरे रंग दिसू लागतील. तुम्ही जे काही गृहीत धरलं होतं ते आणि वस्तुस्थिती यात खूप मोठा फरक आहे. तुमची वरिष्ठ असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देईल.
LUCKY SIGN - A black onyx
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्या. आज ऊर्जा तुम्हाला साह्यभूत असेल, असे संकेत आहेत. नावीन्यपूर्ण प्लॅन्स तयार केले जातील. एखाद्या खर्चिक गोष्टीचा अंतर्भाव करण्यासाठीही मंजुरी मिळू शकेल. काही कौटुंबिक प्रकरणांमध्ये तुमच्या भावंडांना तुमची मदत लागू शकेल.
LUCKY SIGN - A fluorite
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्हाला आता सत्य दिसेल आणि त्याच्या मागे कारणीभूत असलेल्या गोष्टीही दिसतील. तुम्ही सध्या सहमत होण्याचा किंवा न होण्याचा निर्णय घेऊ शकता. परिस्थिती कितीही वाईट असली, तरी एखाद्या व्यक्तीला दुसरी संधी घेऊ द्यावी, असा सल्ला दिला जात आहे. आर्थिक समस्या सुटू शकतील.
LUCKY SIGN - Selenite
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
योगायोग वगैरे काही नसतं. मदतीसाठी एखादी गोष्ट पुढे आली असेल, तर ती तुमच्यासाठीच असण्याची शक्यता जास्त आहे. थोडीशी नाराजी असेल; पण लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.
LUCKY SIGN - A blue calcite
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
सध्याचा काळ सातत्याचा असावा. अखेरीस तुम्हाला योग्य मानसिक स्थितीत असल्यासारखं वाटेल. कठोर निर्णय घेण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागेल. एखाद्या जवळच्या मित्राचं काही नुकसान होण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - Sunstone
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
कामाच्या ठिकाणी तुमची काही नव्या व्यक्तींशी ओळख होण्याची शक्यता आहे. काही जजमेंट करण्यापूर्वी त्यांना समजून घेण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या. वीकेंडला स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी काही प्लॅन आखल्यास योग्य ठरेल.
LUCKY SIGN - An adventurine
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
उत्साहवर्धक वातावरण आणि उत्तम भोजन मिळेल. अशा गोष्टींचा अनुभव तुम्ही घेऊन बराच काळ लोटला आहे. सध्या खूप कष्टाचे, कामाचे दिवस सुरू होते. आज तुमच्या आठवड्याची सुरुवात होत असली, तरी तुम्ही आत्ताच ब्रेकविषयी विचार करत आहात.
LUCKY SIGN - A rose quartz
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
आत्ताची संधी मिळाली नसेल, तर त्याला असलेलं सिल्व्हर लायनिंग तुम्हाला आता लवकरच कळेल. तुमची मुलं तुमच्याकडून वेळाची आणि कमिटमेंटची मागणी करतील. घरातल्या वृद्ध व्यक्ती आरोग्याच्या काही तक्रारी करतील.
LUCKY SIGN - A sodalite
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आता तुम्ही ठरवलं आहेच, तर त्या दिशेने पाऊल उचललं पाहिजे. कारण अशा गोष्टींत वेळ महत्त्वाचा असतो. त्यात उशीर होऊन चालणार नाही. तुमची इन्स्टिंक्ट महत्त्वाची ठरणार आहे.
LUCKY SIGN - A clear quartz
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
छातीवरचं ओझं बाजूला झाल्यामुळे तुम्हाला आता खूप हलकं वाटत असेल. आता तुम्ही प्राधान्यक्रमावर असलेल्या गोष्टीकडे वाटचाल करू शकाल. तुम्ही आता आणखी वेळकाढूपणा करू नका आणि योग्य नियोजन करा.
LUCKY SIGN - A red jasper
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
गेल्या आठवड्यापासून सगळ्या गोष्टींचा वेग मंदावत आहे. ही तात्पुरती स्थिती असेल. तुमच्या नव्याने गवसलेल्या भावभावना तुम्ही पुढे कशा घेऊन जाणार आहात, याबद्दल तुम्ही स्पष्टपणे विचार केला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या गोंधळातून मिसकम्युनिकेशन होऊ शकतं.
LUCKY SIGN - An amzonite
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.