Home /News /lifestyle /

'या' राशीसाठी आर्थिक व्यवहार करणं धोक्याचं? वाचा आजचं राशीभविष्य

'या' राशीसाठी आर्थिक व्यवहार करणं धोक्याचं? वाचा आजचं राशीभविष्य

आर्थिक व्यवहार करताना किंवा गुंतवणूक करताना 'या' राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

    मुंबई, 25 जानेवारी: शनी आजपासून संक्रमण बदलत आहे. याचा प्रभाव प्रत्येक राशीतील ग्रहांवर होणार आहे. याचा परिणाम आज कोणत्या राशीवर कसा होणार आहे वाचा आजचं राशीभविष्य मेष- तणावाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आर्थिक वृद्धी होईल. निष्काळजीपणाचा फटका बसू नये यासाठी काळजी घेणं हिताचं ठरेल. आजच्या दिवशी आपल्या जोडीदारावर काहीही करण्यासाठी दबाव आणू नका. वृषभ - आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करा. कोणत्याही गोष्टीवर आपला निर्णय देताना समोरच्याचा हेतू लक्षात घेणं हिताचं ठरेल. आगामी काळात ऑफिसमधील तुमचे काम अनेक मार्ग दाखवेल. वैवाहिक जीवनात वाद होणार नाहीत याची काळजी घेणं हिताचं ठरेल. मिथुन- उत्तम आयुष्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि प्रणय आपल्याला आनंदी ठेवतील. कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या. आळस झटकून कामाला लागणं फायद्याचं ठरेल. कर्क- संयम गमावू नका. आर्थिक व्यवहाराचे निर्णय घेताना गडबड करून गुंतवणूक करू नका. तुमच्या संयमाची आज परीक्षा घेतली जाईल त्यामुळे धीर सोडू नका. आज तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी खूप झगडावं लागेल. सिंह- जोडीदाराला आजचा वेळ अधिक वेळ द्याल. टीकेचा सामना करावा लागेल. बोलण्यामध्ये सावधगिरी बाळगा. आपल्याकडून जास्त अपेक्षा असलेल्या लोकांना "नाही" म्हणायला तयार रहा. कलागुणांना वाव मिळेल. कन्या- गुंतवणूक फायद्याची ठरेल. कामासाठी तुमची स्तुती केली जाईल. संमिश्र स्वरूपाचा दिवस असेल. खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. तूळ- उत्तम आरोग्यासाठी विश्रांती घेणं हिताचं ठरेल. योग्य वृत्ती चुकीच्या वृत्तीला पराभूत करण्यास सक्षम असेल. आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणांसोबत आजचा दिवस चांगला जाईल. वृश्चिक - आपला आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल काही महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणल्या जातील. प्रियकराबरोबर वेळ घालवणे आवश्यक आहे जेणेकरुन आपण दोघांमधील नातं अधिक दृढ होईल. मेहनतीचं फळ येणाऱ्या आठवड्यात मिळेल. धनु- आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. आज आपली प्रिय व्यक्ती आपल्याबरोबर असेल. जोडीदारासोबत वाद होण्याची संभावना आहे. मकर- घाईत घेतलेला निर्णय समस्या निर्माण करू शकतो. निर्णय घेताना जेष्ठांचा सल्ला घेणं हिताचं ठरेल. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.घडले ते चांगल्यासाठी घडले आज आपण आपला दिवस आपले व्यक्तिमत्त्व विकासासाठी घालवू शकता. जोडीदारासोबत वाद होण्याची चिन्हं आहेत. कुंभ- समस्यांना सामोरे जाण्यासाठी मित्रांची मदत घ्या. भूतकाळ तुमच्या वर्तमानात अडथळा ठरू शकतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं हिताचं ठरेल. प्रवास होतील. खर्च वाढेल. मोकळ्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून आपण बरेच काम करू शकता. मीन- प्रत्येक परिस्थितीत संयम बाळगणं फायद्याचं ठरेल. कठीण परिस्थितीत आज गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. गोपनीय माहिती आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करण्यापूर्वी विचार करा. प्रवास होईल. (वर दिलेली माहिती ही AstroSage.comवर दिलेल्या माहितीच्या आधारे असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या