मुंबई, 17 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानांचा सामना करणं अधिक कठीण असतं. अशावेळी आपल्याला समस्यांची पूर्वकल्पना मिळाली तर तोडगा काढणं अधिक सोपं होतं. यासाठीच जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष- रिअल इस्टेट, जमीन इत्यादी प्रकरणांमध्ये लक्ष घाला. आज आपला मूड चांगला नाही त्यामुळे विचारपूर्वक काम करा.
वृषभ- वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आजचा दिवस चांगला आहे पण आपल्या इच्छेनुसार होणार नाही.
मिथुन- आजूबाजूच्या स्थितीचा आपल्या मनावर परिणाम होईल. गुंतवणूक फायद्याची ठरेल. प्रिय व्यक्तीसोबत वाद होऊ शकतात.
कर्क- तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. आज आपल्याकडून चुका होऊ शकतात त्यामुळे सावध राहा.
हे वाचा-'या' दोन कोरोना लस पोहचल्या अंतिम टप्प्यात, अशी आहे मेड इन इंडिया लशीची स्थिती
सिंह- कामाच्या ठिकाणी ताप होऊ शकतो. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. घरगुती समस्यांमुळे ताण येईल.
कन्या- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नकारात्मक विचारांमुळे ताण येईल.
तुळ- अडचणींचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ न दिल्यानं राग येऊ शकतो.
वृश्चिक- हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
धनु- कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप चांगला आहे. मानसिक शांतता आणि विश्रांती घेण्याची गरज आहे.
मकर - कठीण परिस्थितीत आपला संयम गमावू नका. निराश वृत्तीमुळे कामाच्या ठिकाणी ताण येईल.
कुंभ- कामाचा दबाव वाढल्यानं मानसिक त्रास जाणवेल. आर्थिक दृष्या फायदा होईल.
मीन- आजचा दिवस आपला व्यस्त राहिल. प्रिय व्यक्तीसोबत भांडल्यानं त्रास होऊ शकतो. आपला छंद जोपासण्यावर भर द्या.