मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

राशीभविष्य : तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे शुभ

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 16 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. काहीवेळा आनंद वार्ता तर काहीवेळा समस्या अशा दोन्ही गोष्टींचा समोर येत असतात. येणाऱ्या समस्या काय आहेत याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं होतं. त्यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा 16 मार्चचा दिवस. मेष - नात्यामध्ये चिंता वाढू शकते. संवाद साधण्यात अडचणी येतील. मनातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी धीर धरा. शत्रूपासून सावध राहा. वृषभ- थकवा जाणवेल.कामाचा ताण खूप असल्यानं दिवस व्यस्त राहिलं. सकारात्मक विचार करा आणि धैर्याने कार्य करा. राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन - स्वत:ला व्यस्त आणि आनंदी ठेवा. आपल्या मनात सतत येणाऱ्या विचारांमुळे चलबिचल असाल. तुम्ही आज अडचणीत याल असं कोणतंही काम करण्यापासून दूर राहा. नोकरीच्या संधी मिळतील. कर्क- भावनांवर नियंत्रण ठेवा. समस्यांचा सामना करावे लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. कोणत्याही गोष्टीवरून वाद घालणं टाळा. सिंह - मोठी ऑफर मिळेल. तुम्हाला मोठा फायदा होईल. पार्टनरकडून प्रेम मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक मानसिकता असणाऱ्या लोकांपासून दूर राहा. प्रवासात किंवा अनोळखी ठिकाणी जाताना आपल्या वस्तूंची विशेष काळजी घ्या. हे वाचा-बाजारात मास्क, सॅनिटायझर मिळत नसेल तर एवढंच करा कन्या - अनुभवातून बरेच शिकाल. पैशांशी संबंधित आज आपली कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. प्रेमात पडाल अथवा विवाहाचा प्रस्ताव येईल. तुळ - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील.आपल्या नोकरीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी बरेच नवीन मार्ग मिळतील. जबाबदाऱ्या सहज पार पाडू शकाल. सकारात्मक विचार केल्यानं प्रगतीसाठी फायदा होईल. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. वृश्चिक - गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. प्रिय व्यक्तीच्या रागाची पर्वा न करता प्रेम करत राहा. खर्च होईल त्यामुळे खर्च कमी कसा करता येईल याकडे लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. धनु - आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती समस्यांचा आपल्या मनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे चिडचिडा स्वभाव होण्याची शक्यता आहे. मन रमवण्यासाठी मनोरंजन, फिरणं किंवा वाचनाचा पर्याय अवलंबला तर दिवस चांगला जाईल. मकर - आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. जोडीदारासोबत संवाद साधा. वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. पैशांची चिंता सतावत राहिल. कुंभ - आजचा दिवस आपल्यासाठी फार चांगला आहे. अपेक्षांनी परिपूर्ण भरलेला आहे. कठीण प्रसंगाना सहज तोंड द्याल. आपल्या योजना जवळच्या व्यक्तींना सांगू नका. कुठल्याही गोष्टीवर स्पष्टीकरण देत बसल्यानं समस्या ओढवेल. मीन- आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही. नकारात्मक भावनांपासून दूर रहा.आपणास जे काही यश मिळवायचे आहे, आपल्याला एक किंवा दोन दिवस थांबावे लागेल. आज आपल्या महत्वाच्या कामात तुम्हाला मित्र आणि कुटूंबाची संपूर्ण मदत मिळेल. हे वाचा-'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का?
First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य

पुढील बातम्या