Home /News /lifestyle /

Daily Horoscope: 'या' राशीला नवीन काम करण्याची मिळेल संधी; कसा असेल 15 जूनचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: 'या' राशीला नवीन काम करण्याची मिळेल संधी; कसा असेल 15 जूनचा दिवस? जाणून घ्या

 राशिभविष्य

राशिभविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आज आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याची, तसंच कागदपत्रं आवरून ठेवण्याची गरज आहे. तुम्ही काही गोष्टी पुढे ढकलत आला असलात तर त्या आता लवकरच पूर्ण कराव्या लागणार आहेत. भूतकाळातली एखादी व्यक्ती मदतीसाठी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. LUCKY SIGN – A Rose quartz वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) दिवसभरात एक-दोन मजेशीर घटना घडतील, ज्या अँटी स्ट्रेस थेरपीप्रमाणे काम करतील. तुमचे वरिष्ठ काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याचा फायदा होईल. स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी उत्तम दिवस. LUCKY SIGN – A wooden box मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आज तुम्ही ठरवलेली गोष्ट पूर्ण होईल, मग ती कितीही छोटी का असेना. तुमच्या जोडीदाराला काही गोष्टी थेट तुमच्याकडूनच स्पष्ट करून हव्यात, यामध्ये तडजोड शक्य नाही. कामाची रूटीन तपासणी होऊ शकते. LUCKY SIGN – A bright tie कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी विश्वासू व्यक्ती एकत्र काम करण्याची ऑफर देईल. स्वतःचा बिझनेस असल्यास आर्थिक फायदा दिसू लागेल. मागील काही दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर पुन्हा विचार कराल. LUCKY SIGN – A notebook सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आज तुम्ही एखाद्याला मोठा दिलासा द्याल. आत्ता घ्यायचे काही निर्णय पुढे ढकलाल. एखादी हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A Silver plate कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) एखाद्या गोष्टीबाबत पूर्ण माहिती न घेता मत बनवत असाल, तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कामाचा विस्तार होण्यासाठी काही संधी चालून येतील. एखादी आवड, इच्छा पुन्हा मनात तरळू लागेल. LUCKY SIGN – A Bronze article तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्हाला वाटलं होतं त्याहीपेक्षा आधीच एखादी चांगली बातमी मिळेल. कुटुंबातली एखादी व्यक्ती उदास राहील. तिच्याशी स्पष्ट संवाद साधणं फायद्याचं ठरेल. महत्त्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नका, अन्यथा दुष्परिणाम होतील. LUCKY SIGN – A New upholstery वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादा जवळचा मित्र नकारात्मक विचारांमध्ये गुरफटून जाईल, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला तुमची मदत लागू शकते. आज एनर्जी थोडी कमी वाटेल; मात्र ते तात्पुरतं असेल. घराबाहेर पडून काहीतरी केल्यामुळे एनर्जी पुन्हा येईल. LUCKY SIGN – Sugar Syrup धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही उगाचच भावनिक व्हाल. कामाच्या ठिकाणी एखादी सकारात्मक घडामोड घडेल. खरोखरच तुमच्यासाठी चांगला विचार करणाऱ्या व्यक्ती आणि केवळ तसं भासवणाऱ्या व्यक्ती यांमधला फरक ओळखायला हवा. LUCKY SIGN – A Solar Panel मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्ही ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आहात, अशांपैकी काही व्यक्ती त्या विश्वासास पात्र नाहीत. कुटुंबातल्या एखाद्याकडून मिळालेल्या संदेशामुळे त्रास होईल. एखाद्या नव्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासंबंधी चांगली बातमी मिळेल. LUCKY SIGN – Favourite Fashion Label कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखाद्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व्यक्ती कामाचं कौतुक करतील. तुमच्यावर एखादी अधिकची जबाबदारी येऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं ते अधिक स्पष्टपणे व्यक्त करा. LUCKY SIGN – A Coloured glass मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादं काम पूर्ण करण्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा आजचा दिवस आहे. बॉसला तुमच्याकडून खात्री हवी असेल. तुमच्या स्वप्नाच्या अगदी जवळ पोहोचाल. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. LUCKY SIGN – A blue crystal
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

    पुढील बातम्या