Home /News /lifestyle /

Daily Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तीला अचानक होणार धनलाभ; कसा असेल 14 जूनचा तुमचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तीला अचानक होणार धनलाभ; कसा असेल 14 जूनचा तुमचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्हाला आपण सुमार वातावरणात, सुमार व्यक्तींच्या सहवासात आल्यासारखं वाटत असेल; पण त्याला काही संदर्भ नाही. बऱ्याच काळापासून अडकलेलं काम आता हळूहळू पुढे सरकेल. नवी संधी, नवा विचार किंवा नवी प्रेरणा तुमचं लक्ष आकर्षून घेईल. LUCKY SIGN - A twisted rope वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) परिवर्तनाच्या काळात व्यक्तीने आपला आतला आत्मविश्वास कायम राखण्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सर्व बाजूंनी मदत मिळणार आहे. नवी असाइनमेंट अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा. LUCKY SIGN - A moss stick मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्याबद्दल काही गॉसिप सुरू असण्याची आणि ते तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सभोवती अशा व्यक्ती आहेत, की ज्या एक तर जेलस आहेत किंवा कटकारस्थान रचणाऱ्या आहेत. एखादं महत्त्वाचं लेखी कागदपत्र गहाळ होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A snooze button कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादा पूर्णत्वाला पोहोचायला आलेला प्लॅन रागामुळे संदिग्धतेकडे ढकलला जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या आवडीनिवडींचा पुनर्विचार करायला हवा. तुम्हाला अनुकूल अशी एखादी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A horseshoe सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या गोष्टीवर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही कोणत्या दबावाखाली किंवा बंधनाखाली पुढे जाऊ नये. घरात तुमचा कदाचित वाद होईल आणि तो कदाचित नेहमीपेक्षा जास्त काळ टिकेल. पार्टनरशिपची कोणतीही कमिटमेंट देणं आत्तापुरतं तरी टाळलं पाहिजे. LUCKY SIGN - A parachute कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) नवं रूटीन पाळणं तुम्हाला सध्या कदाचित त्रासदायक वाटत असेल; मात्र त्याचा पुढे फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये काही अडथळे, विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे; मात्र ही तात्पुरती स्थिती आहे. एखाद्या रिटेल थेरपीसाठी तुम्ही थोड्या काळात खूप जास्त खरेदी करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A key holder तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही गुंतवणुकीच्या शोधात असाल किंवा नवं काही तरी सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीच्या शोधात असाल, तर तुम्हाला काही संदर्भ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे दीर्घकालीन प्लॅन्स संथ असले, तरी ते काम करत असल्याचं जाणवेल. घरातलं अस्वस्थ वातावरण आता शांत होईल. LUCKY SIGN - Snowman वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) जी गोष्ट पूर्णतः तुमची नाही, त्याबद्दल तुम्हीही याआधीही खूप आशावादी बनण्याचा प्रयत्न केला होतात. त्याचे परिणाम फारसे उत्साहवर्धक नाहीत. काही वेळा तुम्ही सतत प्रयत्न करत राहिलात, तर एखादी छोटी आशासुद्धा बरंच काम करते. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silk tie धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या इतरांकडून असलेल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. एखाद्या छोट्या कारणावरूनही तुम्ही खूप चिडण्याची शक्यता आहे. मनोरंजनासाठी घराबाहेर जावंसं तुम्हाला वाटणार नाही; मात्र तुमच्या सभोवती असलेल्या इतरांना तसं वाटू शकतं. LUCKY SIGN - A black tourmaline मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती कदाचित चिंताजनक होऊ शकते. तुम्हाला त्याचा मानसिक ताण येऊ शकतो. एखादी छोटी मदत किंवा कोणाकडून तरी घेतलेलं कर्ज तुम्हाला सध्याच्या परिस्थितीशी दोन हात करायला मदत करू शकतं. सध्याच्या आर्थिक ताणाच्या काळात काहीसा दिलासा मिळू शकतो. LUCKY SIGN - A rabbit कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला जी काही वागणूक मिळणार आहे, ती तुम्हाला अपेक्षित असू शकेल. ही सकारात्मकता कौतुकास्पद आणि आनंद घेण्यासारखी आहे. अचानक एखादा प्रवास होण्याचा योग असून, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला अखेर भेटू शकाल. LUCKY SIGN - Yellow flower मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) भूतकाळातल्या रिलेशनशिप्स, गतकाळातल्या आठवणी, दाबून ठेवलेल्या भावना आदी आज उफाळून येतील. कधी तरी या भावनाही अनुभवणं महत्त्वाचं असतं. डेडलाइनशी संबंधित कामाच्या कमिटमेंट्समध्ये काही किरकोळ अडथळे येऊ शकतात. LUCKY SIGN - A nightingale
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या