राशीभविष्य : वृषभ आणि मीन राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

12 राशींसाठी कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या.

  • Share this:
    मुंबई, 14 मार्च : आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांचा परिणाम आपल्या दिवसावर होतो. त्यामुळे प्रत्येक दिवस एकसारखा असेलच असं नाही. आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या 14 मार्चचं राशीभविष्य. मेष - भावनिक आणि मानसिक ताण येऊ शकतो. आज आपण पैसे खर्च कऱण्याच्या मनस्थितीत असाल. भागीदारी व्यवसायात मोठा नफा मिळेल. वृषभ- दीर्घ काळ आजारापासून आज आपली सुटका होईल. समस्यांचा सामना करावा लागेल. मनोरंजनावर जास्त पैसे खर्च करू नका. आज तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याबरोबर वेळ घालवेल. मिथुन - आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार नाही मात्र निराश होऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. खर्चात वाढ होईल, नातेवाईकांकडून मदत मिळेल. कर्क -सर्जनशीलतेचा मोठा फायदा होईल. ज्येष्ठांकडून आज विरोध होईल. आज आपलं मन आपण शांत ठेवणं आवश्यक आहे. नियोजनबद्ध दिवस असेल तर आजचा दिवस चांगला जाईल. सिंह - इतरांवर टीका करणं टाळा, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.नवीन कल्पनांना वाव द्या. हे वाचा-आईच्या चुकीमुळे गेला 6 महिन्यांच्या मुलीचा जीव, मुंबईत कार अपघातात 3 जण ठार कन्या - अनपेक्षित खर्चाचा तुमच्यावर आर्थिक बोजा वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. उद्योजकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराकडून आपुलकीची अपेक्षा केली तर हा दिवस आपल्या आशा पूर्ण करू शकेल तुळ - पुरेशी विश्रांनी न मिळाल्यानं थकवा जाणवेल. वृश्चिक - अंदाजपंचे गुंतवणूक करणं आणि पैसे कमविण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण होतील. धनु - चांगल्या गोष्टींचा शुभारंभ करा. आर्थिक योजनांमध्ये अडकण्यापासून टाळा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. प्रवास फलदायी ठरेल. मकर - भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. करियरचं नियोजन करा. आपला खर्च वाढल्यानं बजेट कोलमडेल. बोलताना काळजी घ्या. कुंभ - आनंदी रहा कारण चांगली वेळ जवळ येणार आहे. आर्थिक योजनांमध्ये अडकणे टाळा - गुंतवणूकीत खूप सावधगिरी बाळगा. आज लोक आपली प्रशंसा करतील. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवाल. त्यामुळे आज आपल्याला आनंद मिळेल. मीन- उत्तम आयुष्यासाठी आपले आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्याचा प्रयत्न करा. बँक व्यवहारात खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. हे वाचा-आमिर आणि सलमान दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होते आणि...
    First published: