मुंबई, 13 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास बाळगा. कामाच्या ठिकाणी आज आपलं नीट मन लागणार नाही. वेळ वाया घालवू नका.
वृषभ- दीर्घ प्रवास फायदा मिळवून देणारे असतील. आज खरेदी करणं सोपं होऊन जाईल. विवाहित जीवनासाठी खास दिवस.
मिथुन- तळलेले पदार्थ खाणं टाळा. प्रेमात आजचा दिवस यशस्वी होईल. आपल्याला प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कर्क- अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. बर्याच जुन्या आठवणी ताजेतवाने होतील. आज अपेक्षित भेटीगाठी आणि संवाद होतील.
हे वाचा-कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार
सिंह- आपलं आरोग्य चांगलं राहिल. पालकांच्या मदतीने आपण आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकाल.
कन्या- खाण्याच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. आज गुंतवणूक करणं टाळा.
तुळ- आज आपल्या खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाची कामे मध्यभागी अडकू शकतात.
वृश्चिक- आरोग्य चांगलं राहिल पण आज खर्च जास्त होईल. समस्या समजून शांतपणे सोडवा.
धनु- डोळ्यांच्या समस्या उद्भवतील अशा रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
मकर - आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवसात व्यवहार, हाती घेतलेलं काम या सगळ्यांमध्ये सावधगिरी बाळगा.
कुंभ- आज आपल्याला आरामाची गरज आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहा. मन शांत ठेवा आणि संयम बाळगा.
मीन- कामाच्या दबावातून घरात वाद होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.