मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : गुंतवणूक करताना 'या' राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी

राशीभविष्य : गुंतवणूक करताना 'या' राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कसा असेल आपला आजचा दिवस, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 31 जानेवारी : प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधीकधी काही दिवस आपल्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येतो तर कधीकधी आपल्यासमोर अशी अनेक आव्हाने असतात. काही दिवस असे घडते, जेव्हा मन आतून खूप आनंदित होते, कधीकधी दिवसभर दु: ख सहन करावं लागतं. हे आपल्या राशीच्या चिन्हामुळे आणि ग्रहांच्या स्थितीमुळे आहे. आपला दिवस कसा असेल, जर हे माहित असेल तर आपण सावधगिरी बाळगून आपला दिवस चांगला बनवू शकतो. चला जाणून घेऊया 31 जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष - आरोग्याची काळजी घ्या. संयम राखा, जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदी जाईल. मानसिक शांतता तुमच्या भविष्याच्या योजनांसाठी हिताची ठरेल. व्यक्तीमत्त्व सुधारण्याकडे अधिक लक्ष देणं हिताचं ठरेल. आजचा दिवस समाधान देणार असेल.

वृषभ - भावनिक निर्णय घेताना सदसद विवेकबुद्धी सोडू नका. आर्थिक योजनांमध्ये सध्या पैसे गुंतवण्याचं धाडस नको. गुंतवणूक करताना फसवणूक होणार नाही याची काळजी घेणं हिताचं ठरेल. प्रेमातून आनंद मिळेल. तुम्हाला एक सप्राईज मिळेल.

मिथुन - पैशांची बचत कराल. नव्या गोष्टी आजचा दिवस खास बनवतील. मित्र-मैत्रीणींसोबत घालवलेला वेळ सत्कारणी लागेल. निर्णय घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. जोडीदाराचे स्वस्थ सांभाळा.

कर्क - आर्थिक फायदा होईल. पैसे कमवण्याचा नव्या कल्पना सुचतील. आज आखलेल्या योजनांमध्ये शेवटच्या क्षणी बदल करावा लागू शकतो. खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे.

सिंह - घरगुती समस्या सोडवाल. कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवू शकतात. आरोग्यासंदर्भातील अडचणी जाणवतील. प्रवासात अथव्या नव्या ठिकाणी सामानाची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गडबड संकट निर्माण करू शकते.

कन्या - स्वार्थी वागणुकीमुळे समस्या ओढवू शकतात. इच्छेविरोधात गोष्टी होतील मात्र संयमानं घ्या. शारीरिक आजार बरा होईल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईक आणि जुन्या भेटीगाठी होतील.

तुळ - आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चात वाढ होईल. प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यवसायिक आणि नोकरदारांनी कामात सावधगिरी बाळगणं हिताचं ठरेल. प्रवासादरम्यान सामानाची काळजी घ्या. संधीचा फायदा घ्या.

वृश्चिक - समस्यांचा सामना करावा लागेल. करमणुकीवर वेळ आणि पैसा खर्च करू नका. जोडीदार दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या.अनौपचारिक प्रवास आणि धावपळीमुळे आजचा दिवस तणावपूर्ण जाईल. यशाचा मार्ग सापडेल. मित्रा-मैत्रीणींसोबत भेटून संवाद साधा. वाद आणि गैरसमज होणार नाहीत याची काळजी घेणं हिताचं ठरेल.

धनु - स्वत:साठी पुरेसा वेळ द्या. संधीचा फायदा घ्या.आर्थिक सुधार होईल. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष देताना संयम राखा. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता सतावू शकते. प्रिय व्यक्तीसोबत तुमचा संवाद होईल. जुन्या आठवणी आनंद देण्याऱ्या असतील.

मकर - दीर्घ आजारपण आपल्या दु:खाचं कारण असू शकतं. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आनंदी राहण्याची गरज आहे. नवीन आर्थिक योजनांना सामोरे जावे लागेल, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि उणीवांचा काळजीपूर्वक विचार करा. आपल्या मित्रांसमवेत थोडा वेळ घालवा. कामाच्या ठिकाणी व्यवसायात धीर सोडू नका.

कुंभ - आजचा दिवस मनोरंजक आणि मजेदार असेल.बोलताना आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घरगुती समस्यांवर तोडगा काढाल. प्रियजनांच्या अनावश्यक मागण्यांकडे दुर्लक्ष करा. घाईघाईने निर्णय घेणे धोक्याचं ठरू शकतं.

मीन - खर्चात अनपेक्षित वाढ होईल. प्रेम प्रकरणांसाठी आजचा चांगला दिवस. आजचा दिवस खूपच सुंदर असेल. जोडीदाराला तुमचं म्हणणं पटवून देणं कठीण जाईल. सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला दुसऱ्या फायद्याच्या दिवसाकडे नेईल. आप्तेष्ट आणि नातेवाईकांसोबतचा वेळ सत्कारणी लागेल.

First published:

Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य