Home /News /lifestyle /

गुंतवणूक करताना वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सांभाळा, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

गुंतवणूक करताना वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सांभाळा, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

जाणून घ्या 3 फेब्रुवारीचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे?

    मुंबई, 3 फेब्रुवारी: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. कधी आनंद वार्ता घेऊन येतो तर कधी समस्यांचा डोंगर. येणाऱ्या दिवसातलं आव्हान काय आहे हे जर आधीपासून आपल्याला माहीत असेल तर त्या आव्हानासाठी आपण कायम सज्ज राहातो किंवा ती समस्या उद्भवू नये यासाठी खबरदारी घेतो. ग्रहांचा आपल्या राशीवर प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीनुसार त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. चला तर जाणून घेऊया आज आनंदाची बातमी कोणाला मिळणार आणि समस्यांचा सामना कुठल्या राशीला करावा लागणार. मेष - गर्भवती महिलांनी आज आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळाच्या दृष्टीनं आज केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. कोणताही निर्णय घेताना भावनिक होऊ नका. जोडीदारासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. वृषभ - व्यवसाय, भागीदारी किंवा आर्थिक गुंतवणूक करणं आज टाळा. निर्णय घेण्याआधी विचार करा. मुलांसोबत झालेल्या वादामुळे तणाव जाणवेल. जोडीदारासोबत वाद होतील. एखाद्या समस्येपासून दूर जाण्याचा विचार कराल तेवढी ती समस्या तुमच्या जास्त जवळ येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मिथुन - आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराला सगळी माहिती देणं धोक्याचं ठरेल. कामाचा ताण वाढेल. उत्साह आणि ऊर्जेनं भरलेला दिवस असेल. नोकरी आणि व्यवसाहिकांना कठोर मेहनत करावी लागेल. कर्क - आत्मविश्वास वाढवा, कर्ज किंवा नुकसान भरपाईची कामं अडकतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रेम संबंधांमध्ये पुढचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं विचार करा. अखेरच्या क्षणी अनेक योजनांमध्ये बदल होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. मित्रांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. सिंह - जोडीदाराच्या आरोग्याबाबत समस्या उद्भवू शकतात. रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त निधी गुंतविला जाऊ शकतो. आज आपला दिवस आनंदात जाणार आहे. प्रेमात थोडी निराशा वाटेल. कामाचा जास्त ताण असेल. येणाऱ्या समस्यांमध्ये अडकून राहाणं टाळा त्यामुळे अस्वस्थ वाटेल. चिडचिडेपणा जाणवेल. प्रियजनांच्या आठवणींने दिवस चांगल जाईल. महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता. कन्या - आरामाची गरज आहे. मित्र-कुटुंबीयांसोबत घालवलेला वेळ आनंद देणारा असेल. जमीन, रिअल इस्टेट, गुंतवणूक इत्यादी व्यवहारांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये जोडीदाराचं सहकार्य लाभेल. तुळ - प्रियजनांची कामाच्या ठिकाणी उणीव जाणवेल. अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमात आज जर तुम्ही पुढाकार घेतला तर फायदा जास्त होईल. महत्त्वाची काम आजच करून घ्या. आपला एक चुकीचा निर्णय जोडीदारासोबत वाद होण्याचं कारण ठरेल. आज स्वत: थोड शांत आणि संयम ठेवल्यानं बरेच प्रश्न सोडवणं शक्य होईल. वृश्चिक - आज तुमचा आत्मविश्वास दृढ होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये जेष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल. गुंतवणूक करताना विचार करा. आपल्या कष्टानं मिळवलेल्या पैशातून गुंतवणूक करा. शब्द देताना विचार करा. दिलेला शब्द मोडणार नाही याची जबाबदारी घ्य़ा. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल. धनु - आपला हट्टी स्वभाव नडेल. गुंतवणूक केलेले पैसे आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्याला टीकेचा सामना करावा लागू शकतो. समस्यांनासोबत लढण्याचं बळ ठेवा. त्यांच्यापासून दूर जाणं हा तुमच्याकडे पर्याय असू शकत नाही. योग्य आहार आणि चांगली झोप यामुळे आज तुमचं आरोग्य चांगल राहिल. मकर - आज आपणास उर्जा मिळेल. वेळेआधी कामं करण्याकडे आज तुमचा कल राहिल. वाढलेले खर्च आज तुमचं बजेट बिघडवू शकतात. लग्नासाठी आजचा मुहूर्त चांगला आहे. कोणतंही शुभ काम करण्याचा विचार करणार असाल तर आजच सुरुवात करा. उद्दीष्ट आणि ध्येय यशस्वी करण्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल कराल. एखाद्या वादात अथवा समस्येवर आपलं मत मांडणं टाळा. न्यूनगंड आणि एकाकीपणाला स्वत:वर हावी होऊ देऊ नका. मन रमवण्यासाठी फिरणं, छंद जोपासणं हा उत्तम पर्याय आहे. कुंभ - रीफ्रेश होण्यासाठी विश्रांती घ्या आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजनांना सामोरे जावे लागेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगल्या आणि वाईट गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा. नियंत्रण ठेवा, बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम आजही पुढे ढकललं जाऊ शकतं. मित्रांसोबत वेळ घालवाल. मीन - दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा. तुमची बेफिकीर वृत्ती तुमच्या पालकांना दु: खी करू शकते. नवीन योजना पुढे येतील. कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी मित्रांचं मत जाणून घ्या. जर आपण स्वत: ला शांत ठेवले आणि संयमाने कार्य केले तर आपण प्रत्येकाची मनःस्थिती सुधारू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी झालेल्या संभाषणामुळे वातावरण थोडेसे त्रासदायक असू शकते. हेही वाचा-थांबा! आताच सिगरेट सोडा नाहीतर पश्चाताप करण्यासाठीही वेळ मिळणार नाही हेही वाचा-फॅमिली ट्रिपवर जात आहात, पालकांनो 'ही' काळजी जरूर घ्या
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope

    पुढील बातम्या