मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राशीभविष्य : मेष आणि मीन राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करताना सावधान

राशीभविष्य : मेष आणि मीन राशीच्या लोकांनी आज गुंतवणूक करताना सावधान

कोणाला मिळणार शुभ वार्ता कोणाचे स्टार्स चमकणार? जाणून घ्या आजच राशीभविष्य.

कोणाला मिळणार शुभ वार्ता कोणाचे स्टार्स चमकणार? जाणून घ्या आजच राशीभविष्य.

कोणाला मिळणार शुभ वार्ता कोणाचे स्टार्स चमकणार? जाणून घ्या आजच राशीभविष्य.

    मुंबई, 13 मार्च : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्या आणि काय अडथळे आहेत याची पूर्वकल्पना असेल तर आपल्याला समस्येवर तोडगा काढणं अधिक सोपं होतं जाणून घ्या आपल्यासाठी कसा असेल 13 मार्चचा दिवस. मेष - वाईट सवयी सोडण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. हुशारीने काम केले तर आज तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं राहिलं. वृषभ- कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आर्थिक नफा मिळेल. नवीन प्रकल्प आणि कार्ये अंमलात आणण्याचा एक चांगला दिवस आहे. प्रवास कराल. मिथुन - आज आपली धावपळ होण्याची शक्यता असे असले तरीही आपलं आरोग्य उत्तम राहिल. घरगुती सोयीच्या गोष्टींवर जास्त खर्च करु नका. नव्या संधी मिळतील. काम, व्यवसायात कठोर परिश्रमांशिवाय आपल्याला पर्याय नाही. कर्क - आरोग्य चांगलं राहिल. विचारपूर्व गुंतवणूक करा. घरगुती कामाचे ताण आणि पैशाच्या पैशाचा ताण आज आपल्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करू शकतो. आपली अर्धवट राहिलेली किंवा अडकलेली कामं पूर्ण करण्यावर भर द्या. सिंह - दीर्घ मुदतीची गुंतवणूक टाळा. मित्रांसोबत घालवलेला वेळ चांगला जाईल. कामात आज आपला दिवस व्यस्त असेल. प्रेमात निराशा जाणवू शकते परंतु हार मानू नका. नवीन गोष्टी शिकण्याचा आपला आग्रह योग्य आहे. हे वाचा-ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस कन्या - भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. दागदागिने आणि पुरातन वस्तूंमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल . पैशांमुळे ताण आज आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकतो. तुळ - आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असेल त्यामुळे आपल्याला कोणीही ब्लॅकमेल करू शकणार नाही. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. काळजीपूर्व बोला त्यामुळे होणारे वाद टाळले जाऊ शकतात. वृश्चिक - धीर धरा, कारण तुमची समजूतदारपणा व प्रयत्न तुम्हाला यशस्वी करतील. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. धनु - खर्च वाढेल पण त्याचबरोबर उत्पन्नातील वाढीचा तोल संतुलित होईल. कामासाठी आजचा दिवस कठीण आहे. प्रवासात आपल्या गोष्टींची विशेष काळजी घ्या. मकर - आनंदी राहण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. आज आपल्याला थकवा आणि उदासिनता जाणवेल ज्यामुळे चिडचिड होईल. कुंभ - आपला मूड चांगला असेल. खर्च वाढेल पण त्याच वेळी उत्पन्नातील वाढ समतोल राखेल. प्रेम आंधळ असतं त्यामुळे भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. अडकलेली कामं पूर्ण होतील. मीन- आपली वागणूक आपल्या पार्टनरची मनस्थिती बिघडवू शकते. हुशारीने गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी समजूदारपणानं वागणं आपल्या फायद्याचं ठरेल. हे वाचा-म्युझिक थेरपीनं कमी होऊ शकतात वेदना, काय आहे तज्ज्ञांचं मत ?
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या