Home /News /lifestyle /

Weekly Horoscope : मधुमेही व्यक्तींना या आठवड्यात जपून राहण्याचे संकेत; कसा जाईल तुमचा आठवडा

Weekly Horoscope : मधुमेही व्यक्तींना या आठवड्यात जपून राहण्याचे संकेत; कसा जाईल तुमचा आठवडा

या आठवड्यात येणाऱ्या देव शयनी आषाढी एकादशीच्या सर्व बांधवांना मंगल शुभेच्छा. चातुर्मास आरंभ होईल.पाहूया या सप्ताहाचे राशी भविष्य.

आज दिनांक ३ जुलै २०२२ रविवार. तिथी आषाढ शुक्ल चतुर्थी , विनायकी चतुर्थी..या सप्ताहात चंद्र सुरुवातीला सिंह राशीत असेल .कुंभ राशीत शनि , वक्री असेल. तर सूर्य बुध मिथुन राशीत असेल. गुरू मीन राशीत भ्रमण करेल. मंगळ राहू व केतू अनुक्रमे मेष व तुला राशीत असतील.शुक्र वृषभ राशीत असेल . या आठवड्यात येणाऱ्या देव शयनी आषाढी एकादशीच्या सर्व बांधवांना मंगल शुभेच्छा. चातुर्मास आरंभ होईल.पाहूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष राशी स्वामी मंगळ राहू योग होणार असून सर्व तऱ्हेने काळजी घ्यावी. पूर्वार्धात चंद्र शुभ फल देईल. कार्यालयीन ,घराच्या कामकाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आठवडा आहे. राशीतील राहू मन भ्रमित करेल. जोडीदाराशी गैरसमज होण्याचे योग आहेत. गुरू लाभाचे ,संततीप्रप्तीचे योग बनवेल. आरोग्य सांभाळावे.आर्थिक घडामोडी होतील. सप्ताह चांगला. वृषभ लभातील गुरू शुभ फल घेऊन येणार आहे.अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे.व्यय राहू आणि केतू आरोग्य सांभाळा ,असे संकेत देत आहे.राशीतील शुक्र सौंदर्य बहाल करेल. .रवि बुध अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देतील. प्रकृती जपून रहा. सप्ताह आनंदात जाईल. मिथुन राशी स्वामी बुध स्वस्थानात रवि सोबत आहे.अधिकार प्राप्ती , प्रमोशन , अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू आर्थिक लाभ घडतील. मात्र वक्री शनि आहे, प्रकृतीची तक्रार सुरू राहील. शुक्र नवीन आनंदाच्या संधी मिळवून देईल परदेश संबंधी योजना यशस्वी होतील. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात गुरू असून व्यय रवि बुध तुम्हाला अधिकारी वर्ग त्रस्त करेल . धार्मिक अधिष्ठान वाढीस लागेल.आर्थिक लाभ होतील. जोडीदार साठी फारसा अनुकूल काळ नाही. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणे योग्य राहील. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल उत्तम असल्यामुळे अडचणी निवारण होतील. मंगळाचा दशम स्थानात प्रवेश झाला आहे. वडिलांशी मतभेद होतील. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवि लाभ स्थानात बुधासोबत असून धर्मा संबंधी शुभ फळ देतील. संतती संबंधी घडामोडी घडतील. दशमात शुक्र कुटुंबात आनंदीआनंद पसरवेल. शनि काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असे सुचवत आहेत. नातेवाईकांना भेटण्यासाठी संधी येईल. राहू मन अशांत ठेवेल. आठवडा आर्थिक लाभाचा ठरेल. कन्या राशी स्वामी बुध रवि बरोबर दशम स्थानात आला आहे. कार्यालयीन कामात भरभराट होईल. अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता सतावेल. गुरू महाराज शुभ फल देतील.मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू विचित्र काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या.आर्थिक लाभ होतील. सप्ताह मध्यम जाईल. तुला राशी स्वामी शुक्र अष्टम स्थानात असून शुभ योग करेल. मंगळ राहू जोडीदाराची काळजी घ्या.व्यवसायास उत्तम काळ. घर आणि वाहन दुरुस्ती कराल.आर्थिक गणित जुळून येतील.रवि बुध नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे .. मन काहीसे अस्वस्थ राहील. सप्ताह उत्तम आहे . वृश्चिक राशी स्वामी मंगळ राहू सोबत युती करणार असून पुढील काही दिवस जपून राहण्याचे आहेत. सप्तम स्थानात शुक्र. घर आणि वाहन या संबंधी शुभ सूचना देइल. संतती कडे लक्ष द्या.त्यांना उत्तम काळ आहे. मधल्या काळात काही समस्या निर्माण होतील. आठवडा शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरू ,राहू सोबत येणारा मंगळ घरासाठी शुभ समाचार आणेल. भावंडाना शुभ फळ देईल .महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील.मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिक दृष्ट्या भक्कम राहील. मकर तृतीय गुरू अनेक नवीन संधी मिळवून देईल.मात्र सावध रहा. फसवणूक नुकसान होऊ शकते. भावंडाना अधिकार योग येतील.संबंध सुधारतील.आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्र प्राप्तीचे नवीन मार्ग खुले करेल.ह्या काळात उपासना, शिधा दान करा. आर्थिक दृष्ट्या जपून रहा.आनंदात सप्ताह जाईल. कुंभ राशी स्थानातील वक्री शनि ग्रह आर्थिक नुकसान, शारीरिक कष्ट दाखवीत आहे.मात्र रवि बुध नवीन प्राप्तीचे मार्ग बनवतील. बोलण्यामध्ये गोडवा येईल. राशीच्या धन स्थानातील गुरू अतिशय शुभ असून कला गुण वर येतील. नवीन निर्मिती कराल. आर्थिक लाभ देईल.पण प्रकृती नाजूक राहील. सप्ताह मध्यम जाईल. मीन गुरू महाराज राशी स्थानात आहेत खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची चिंता दूर राहील. राशी धनस्थानातील मंगळ राहू अधिकार प्राप्ती करून देतील. अचानक अर्थ प्राप्ती होईल..नवे वर्ष आनंदात साजरा कराल. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या