Home /News /lifestyle /

Daily Horoscope : कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope : कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस? जाणून घ्या भविष्य

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वाचा तुमचं आजचं भविष्य...

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला ताण येत असेल, तर आता तुम्ही त्या व्यक्तीला आणि परिस्थितीलाही तोंड देऊ शकाल, अशा कम्फर्टेबल स्थितीत आला आहात. एखाद्या नव्या गोष्टीची हळूहळू होणारी सुरुवात काही तरी दिलासादायक रूप धारण करू शकते. LUCKY SIGN – A seed वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) काही तात्पुरत्या नात्यांचा शेवट दृष्टिपथात येईल. आता ते सोडून देऊन पुढे जाण्याची वेळ आहे. जुन्या गोष्टी इथेच सोडून द्यायला हव्या. त्यांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होता कामा नये. बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स ठरण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A white flower मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) व्यवस्थापनातल्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीसोबत केलेल्या चर्चेमुळे भरपूर ज्ञान मिळेल. तुमच्या व्यावसायिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या काही गोष्टींकडे तुम्ही काणाडोळा करत होता. निष्काळजीपणामुळे तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत होईल. LUCKY SIGN – A rainbow कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) कठीण परिस्थितीत आत्मविश्वास बाळगणं लवकरच तुम्हाला त्या गोष्टीची दुसरी बाजू उलगडून दाखवण्यास मदत करील. एखादं रोमँटिक प्रपोझल समोर येईल आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भविष्यातला कोणताही निर्णय सावधगिरीने घ्या. LUCKY SIGN – A soliatire सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादी स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असाल, तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. आतापर्यंत असलेली किंचितशी अस्वस्थताही दूर होईल. बाहेरच्या अन्नपदार्थांचं जास्त सेवन करू नका. LUCKY SIGN – A flask कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आगामी काही आठवड्यांचं तुमचं काही निश्चित नियोजन असेल. लवकरच एखादा मोठा समारंभ होण्याची शक्यता आहे. हे सगळं एकत्रित समोर येण्याची शक्यता आहे. लवकरच तुमच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A kite तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कधी कधी काही जण वचन देऊन पाळत नाहीत, पण यावरून तुम्ही त्यांची पारख करू नका. तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडत नसतील, तर वेगळ्या कार्यपद्धतीचा अवलंब करून पाहा. आर्थिक प्रवाह सुरळीत राहण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A tourmaline वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचं स्टार्ट-अप असेल, तर आवश्यक असलेली आर्थिक गरज भागवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आंतरराष्ट्रीय पातळीवरची काही घडामोड घडण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट झाल्यामुळे आठवणींना उजाळा मिळेल. LUCKY SIGN – A sea shell धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कुटुंबातल्या किंवा जवळच्या व्यक्तीकडून सरप्राइज मिळेल. लग्नाचे प्रस्ताव येतील आणि लवकरच लग्न होण्याचीही शक्यता संभवते. कायमच एकदम सभ्य राहण्याकडे तुमचा कल असतो. LUCKY SIGN – Kiwi fruit मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) नवीन बिझनेससाठी किंवा भागीदारीसाठी काही जुने मित्र तुमचं मन वळवण्यात यशस्वी होतील. एखाद्या प्रवासादरम्यान ही चर्चा घडेल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थोडा आव्हानात्मक काळ आहे. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील. LUCKY SIGN – A clear quartz कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखाद्या आरोपावरून वादविवाद घडतील. काही व्यक्तींबद्दलची तुमची मतं चांगली होतील. घरच्यांकडून भरपूर पाठिंबा मिळेल. तुमची पैसे उधळण्याची सवय बदलून आता बचत करायला सुरुवात केली पाहिजे. LUCKY SIGN - Lilies मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कधी कधी मागे जाऊन आपला पाया कसा आहे, सुरुवात कशावर आधारलेली आहे, हे तपासून पाहावं लागतं. ऑफिसमधला एखादा वरिष्ठ सहकारी तुम्हाला योग्य सल्ला देईल. प्रत्येक गोष्टीची चर्चा सगळ्यांशी करू नका. LUCKY SIGN – A rock
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या