Home /News /lifestyle /

Daily Horoscope : उद्या जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत, जपून राहा!

Daily Horoscope : उद्या जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत, जपून राहा!

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

जाणून घ्या कसा जाईल उद्याचा दिवस...

दिनांक १६ मे २०२२. वार सोमवार आज वैशाख पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा. सकाळी ९वाजून ४३ पर्यंत पौर्णिमा राहील. आज चंद्र तुला राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या सप्तम स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. त्यावर मेहनत करून यश प्राप्त होईल. जोडीदार मदत करेल. आज प्रवास योग येणार आहे. उत्तम दिवस. वृषभ राशीच्या दशम स्थानात आलेला मंगळ अती शुभ असून अनेक नव्या संधी प्राप्त करून देईल. व्यवसायात उत्तम प्राप्ती होईल. अनेक लाभ होतील.दिवस उत्तम. मिथुन पंचम चंद्र शनि योग असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क अष्टम स्थानात प्रवेश केलेले मंगळ शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज चतुर्थ असून शत्रूपासून सावध राहा असे सुचवीत आहे. दिवस मध्यम . सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळी पासून अनेक लाभ होतील. दिवस शुभ. कन्या सहावा मंगळ शनी आणि द्वितीय चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. दिवस शुभ. तुला आज दिवस शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल . उच्च शिक्षण आणि संतती साठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस अतिशय जपून राहण्याचा आहे.गृह सौख्य, जोडीदार या बाबत सांभाळून राहा.प्रकृतीची काळजी घ्या.दिवस मध्यम फळ देईल. धनु तृतीय स्थानात मंगळ शनि भावंडांशी मतभेद घडवून आणेल.लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. जोडीदार सोबत दिवस घालवा. मकर आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ कुंभेत गेल्याने शनि मंगळ एक राशी मध्ये असून आर्थिक ताण राहील. आणि कौटुंबिक कलह होतील. दिवस मध्यम. कुंभ राशी मध्ये शनिसोबत मंगळ आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल. संतती त्रास देऊ शकते. दिवस उत्तम आहे. मीन व्यय स्थानात मंगळ शनि आणि राशीत गुरू शुक्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि शारीरिक त्रास दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या