Home /News /lifestyle /

Daily Horoscope : जोडीदाराला जपून राहण्याचा काळ, वटपौर्णिमेला 'या' राशीसाठी चिंताजनक बातमी!

Daily Horoscope : जोडीदाराला जपून राहण्याचा काळ, वटपौर्णिमेला 'या' राशीसाठी चिंताजनक बातमी!

मीन - मे महिना मीन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा देईल. मोठी प्रगती होईल, तुमचे उत्पन्नही वाढेल. तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. ज्यांना बदलीची इच्छा होती, त्यांची इच्छा पूर्ण होईल. एकंदरीत वेळ छान असेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मीन - मे महिना मीन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा फायदा देईल. मोठी प्रगती होईल, तुमचे उत्पन्नही वाढेल. तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. ज्यांना बदलीची इच्छा होती, त्यांची इच्छा पूर्ण होईल. एकंदरीत वेळ छान असेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. आज वटपौर्णिमा साजरी करण्यात येईल. सायंकाळी पाच वाजून २२ मिनिटानी पौर्णिमा समाप्त होईल. हे स्त्रियांचे सौभाग्य व्रत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक १४ जून २०२२. वार मंगळवार. आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. आज वटपौर्णिमा साजरी करण्यात येईल. सायंकाळी पाच वाजून २२ मिनिटानी पौर्णिमा समाप्त होईल. हे स्त्रियांचे सौभाग्य व्रत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज अष्टम चंद्र आहे. दिवस काहीसा तणावात जाईल. शनी कामात लाभ मिळवून देईल. तसेच कार्यक्षेत्रात नाव मिळवून देईल. धार्मिक कामात मन रमवा. दिवस मध्यम. वृषभ आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र सप्तम स्थानात उत्तम आहे. जोडीदाराच्या आयुष्याची मंगल कामना कराल. दिवस शुभ. मिथुन षष्ठ स्थानात चंद्र धार्मिक कामात काही अडचणी आणेल. आर्थिक लाभ घडतील. प्रवास योग येतील. कार्य क्षेत्रात नाव मिळेल. दिवस मध्यम. कर्क आज राशीच्या पंचम स्थानातील चंद्र संतती संबंधी मानसिक ताण होईल असे सुचवीत आहे. मन अशांत राहील. आर्थिक दृष्टया दिवस उत्तम जाईल. उपासना करा. सिंह शनि सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. चतुर्थ चंद्र आज काम, व्यवसायात यश देईल. दिवस चांगला आहे. कन्या मानसन्मान, आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. प्रवासयोग येतील. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. दिवस मध्यम आहे . तुला आज दिवस कुटुंबासाठी वेळ द्या असे सांगत आहे. घरातील दुखणी, खर्च आता कमी होतील. चंद्र भरपूर आर्थिक लाभ देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आई वडिलांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंध सुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आनंद अनुभवाव. संततीसाठी दिवस बरा. धनु शुक्र राहू पंचम स्थानात संभ्रम निर्माण करतील. चंद्र आर्थिक अडचणी आणेल. कुटुंब सुख मिळेल. घरात काम भरपूर करावे लागेल. दिवस मध्यम. मकर शनि सध्या तुमच्या धन स्थानात आहे. चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. स्वभाव काहीसा उग्र होईल. शांत रहा. लवकरच बदल होईल. दिवस बरा. कुंभ आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणे सुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. मानसिक बळ देईल. दिवस चांगला आहे. मीन छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. पौर्णिमा भाग्याची जाईल. दिवस उत्तम. शुभम भवतू !!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या