मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज गुंतवणूक करणं टाळा

राशीभविष्य : कर्क आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज गुंतवणूक करणं टाळा

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य

  मुंबई, 27 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या समस्यांची पूर्वकल्पना आपल्याला मिळाली तर समस्या सोडवणं अधिक सोपं होतं यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

  मेष- मानसिक ताण हे शारीरिक आजाराचे मूळ कारण असू शकते. मागच्या दिवसांची मेहनत फळाला येईल. कामाच्या ठिकाणी अनेक जण खोडा घालणारे असतील. आज प्रवास करू नका.

  वृषभ- आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक आलेल्या कोणत्याही चांगल्या बातमीमुळे संपूर्ण कुटुंब आनंदी होईल.

  मिथुन- आज विश्रांती घेणं आवश्यक आहे. आज आपली कामं सहज पूर्ण होतील. इतरांची मत ऐका.

  कर्क- आज गुंतवणूक करणं टाळा. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागेल. आज आपल्या योजना बिघडू शकतात.

  सिंह- आज आपल्याला विश्रांती घेणं आवश्यक आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवणं आवश्यक आहे.

  कन्या- गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. आज आपल्याला विश्रांतीची गरज आहे. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे.

  हे वाचा-चला बॅग पॅक करा! अंतराळ पर्यटनाची तयार राहा, SPACE WALK ची सुवर्णसंधी

  तुळ- तंदुरुस्त राहण्यासाठी आपला आहार आणि व्यायाम नियमित करा.खर्च वाढतील जे आपल्यासाठी समस्या ठरतील.

  वृश्चिक- आज आपल्याकडे योग्य स्वरुप सुधारण्यासाठी पुरेसा वेळ असेल. अचानक अनपेक्षित खर्च आपल्यावर आर्थिक भार टाकू शकतात. कामाच्या संबंधात प्रवास फायदेशीर ठरेल.

  धनु- आरोग्याची समस्या जाणवेल. आज सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

  मकर - आपण स्वतःला आजारी वाटू शकता. असे दिसते आहे की गेल्या काही दिवसांमधील कामामुळे आपल्याला कंटाळा आला आहे.

  कुंभ- दीर्घकालीन गुंतवणूक टाळा. मित्रांसोबत आज बोलल्यानं आनंद मिळेल.

  मीन- तणावामुळे मानसिक शांतता नष्ट होईल. भूतकाळातील घटनांमुळे आज आपण उदास व्हाल. या घटनांमधील व्यक्ती आज आपल्याला संपर्क करतील.

  संपादन- क्रांती कानेटकर

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Horoscope