राशीभविष्य : सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींनी रागाव ठेवायला हवं नियंत्रण

राशीभविष्य : सिंह आणि मीन राशीच्या व्यक्तींनी रागाव ठेवायला हवं नियंत्रण

प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो.

  • Share this:

मुंबई, 02 मे: प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील ग्रहाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागली तर त्यांचा सामना करणं आधीक सोपं होतं त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल 02 मेचा दिवस.

मेष- वेळेआधी आपली कामं पूर्ण होतील. गुंतवणूक आणि योजनांची माहिती कुणालाही देऊ नका. संयम ठेवा धीर सोडू नका. नकारात्मक विचार भविष्यासाठी तोट्याचे आहेत.

वृषभ- दुपारनंतर आपल्याला अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाचा येणारा ताण आणि दबाव यामुळे राग येऊ शकतो.

मिथुन- आजचा दिवस आपल्यासाठी वाईट आहे. पण धीरानं घ्या. सकारात्मक विचार आणि प्रयत्नांनी आपल्याला यश मिळेल. पार्टनरनं छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाईट वाटू शकतं.

कर्क- सकारात्मक विचारांनी समस्यांवर तोडगा निघेल. आज आपल्याला आर्थिक फायदा होईल.

सिंह - राईचा परवत करू नका.रागावर योग्य वेळेत नियंत्रण मिळवणारे भाग्यशाली असतील.

हे वाचा-कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Work From Home, घरात स्ट्रेस इटिंगपासूनही बचाव करा

कन्या- मानसिक गोंधळ आणि संभ्रम टाळण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे आपल्यासाठी खूप कठीण आहे. व्यवसायात फायदा होईल.

तुळ- जोडीदारासोबत वादविवाद होतील. इतरांचं ऐकून केलेल्या गुंतवणुकीतून तोटा होईल. कामाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण नसेल.

वृश्चिक- व्यक्तीमत्त्व विकासासाठी प्रयत्न करा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रेमात मक्तेदारी गाजवू नका. जोडीदारासोबत वाद होणार नाहीत याची काळजी घ्या

धनु- आज अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होतील. प्रेमाच्या बाबतील आज दिवस कठीण जाईल.

मकर- अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. हट्टीपणाचं वागणं आपल्या तोट्याचं ठरू शकतं. शेवटच्या क्षणी योजना बदलाव्या लागतील.

कुंभ- खर्चात वाढ होईल, परंतु त्याच वेळी उत्पन्नातील वाढ समतोल राखेल. आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय वेळ घालविण्यात तुम्हाला अडचण येईल. आजचा आपल्याला फायदा मिळवून देणारा आहे.

मीन- वादविवादामुळे आपली मनस्थिती बघडू शकते. कोणताही प्रकारचा वाद तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. आपले खर्च बजेट खराब करू शकतात.

हे वाचा-लक्षण दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 2, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या