Home /News /lifestyle /

राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज असेल कामाचा ताण

राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज असेल कामाचा ताण

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

    मुंबई, 09 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- आर्थिक भार वाढल्यानं आज बजेट कोलमडेल. दिवसाची सुरुवात प्रिय व्यक्तीच्या स्मितहास्याने होईल. वृषभ- समस्या लवकर सोडवण्यावर भर द्या. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण ठेवणे चांगले असेल. मिथुन- वेळ आणि पैसा जास्त खर्च करू नका. आपल्या जोडीदाराशी भांडण करू शकता. कर्क- आज संयम आणि बुद्धीचा वापर करा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. सिंह- आज आपली मानसिक शांतता भंग होईल. अनिश्चितता आपल्याला मानसिक ताण देऊ शकते. कन्या- प्रेमाच्या बाबतीत आज आपल्याला संयम राखणं गरजेचं आहे. जोडीदाराबरोबर तुम्हाला बराच वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. हे वाचा-पगार नाही मन मोठं असावं लागतं; सफाई कर्मचाऱ्याला 20000 पगार, पण लाखोंचं केलं दान तुळ- कामाचा ताण असल्यानं निराशा होईल. बराच काळ अडलेला नुकसान भरपाई आणि कर्ज इ. शेवटी तुम्हाला उपलब्ध होईल. वृश्चिक- द्वेषाची भावना आज आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आज जास्त खर्च करू नका. धनु- आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. जोडीदाराची काळजी घ्या दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. मकर - नुसत्या ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आजची कामं उद्यावर पडतील त्यामुळे योग्य नियोजन करा. कुंभ- आज तुम्हाला थकवा जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मीन-वृद्धांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विशेष गरज आहे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या