राशीभविष्य : सिंह आणि मकर राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक फायदा

राशीभविष्य : सिंह आणि मकर राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक फायदा

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 09 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे आज दिवसभरात येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागली तर त्यावर मार्ग काढणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचं आपलं राशीभविष्य.

मेष - पैसे मिळवण्याच्या नव्या संधी प्राप्त होतील. अडचणींचा सामना करावा लागेल. घडलेल्या गोष्टी मागे सोडून पुन्हा नव्यान सुरुवात करा. ध्यान धारणेमधून आज आपण मानसिक स्वास्थ चांगलं ठेवू शकता.

वृषभ- घाईगडबडीनं कोणतंही काम करू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. प्रियकराचा मूड बिघडल्यास आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. आपल्या गोष्टींची काळजी घ्या अन्यथा चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिथुन- मित्र-मैत्रीणीसोबत आपले मतभेद होऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. जमीन आणि रिअल इस्टेट यामध्ये आज लक्ष देण्याची गरज आहे.

कर्क- विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे. अलिकडच्या काळात मानसिक दबाव मोठ्या प्रमाणत वाढला आहे. वाढलेले खर्च आपलं बजेट बिघडवू शकतात.

सिंह - आज आपल्याकडे पैसे येतील. भागीदारी व्यवसाय करणं फायदेशीर आहे. जोडीदारासोबत घालवलेला वेळ मौल्यवान असेल.

हे वाचा-फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या...नाहीतर घरी कोरोनालाही आणाल

कन्या- आज आपला उत्साह दुप्पट असेल. गुंतवणूक करणं टाळा. प्रिय व्यक्तीबद्दल खूप संवेदनशील असाल. रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठा तोटा होऊ शकतो.

तुळ- आज आपल्याला तणाव आणि थकवा जाणवेल. गुंतवणूक करताना आधी नीट माहिती घ्या. प्रिय व्यक्तीसोबत आजचा दिवस छान जाईल.

वृश्चिक- तज्ज्ञांच्या सल्ल्ल्यानं गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आज आपल्या बुद्धमत्तेचा वापर करा.

धनु- जोडीदारासोबत वेळ घालवल्यानं आनंद मिळेल. कलात्मक आणि सर्जनशील क्षमतांचं आज कौतुक होईल. व्यक्तीमत्त्व विकासावर लक्ष केंद्रीत करा.

मकर- अस्वस्थतेची भावना तुम्हाला त्रास देऊ शकते. महत्त्वाच्या योजना राबवल्या जातील. त्यावेळेवर पूर्ण केल्यानं आर्थिक फायदा होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

कुंभ- उत्पन्नात वाढ झाली तर आपलं बजेट कोलमडेल. जोडीदाराच्या वागणुकीमुळे आजचा दिवस खराब होऊ शकतो.

मीन- सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास कायम ठेवा. वाईट सवयींपासून स्व:तला दूर ठेवा. प्रेम जीवनात आशेचा किरण दिसेल. दबावाखाली न येता व्यवहार करा.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये तुमचीही चिडचिड होतेय का? मग हे उपाय करा

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 9, 2020, 7:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या