• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगा

राशीभविष्य : तुळ आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगा

कोणत्या राशीसाठी आहे आजचा शुभ दिवस अणि कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस. मेष- आज आपल्याला खूप थकवा जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल. वृषभ- मित्रांच्या मदतीनं आज आपण अडचणींवर मात कराल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मिथुन- आज आपल्यावर लोक टीका करतील. यशासाठी स्वप्न पाहाणं वाईट नाही पण त्या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत. कर्क- मूड बदलण्यासाठी मेळावे, कार्यक्रम इत्यादीमध्ये मन रमवा. बँकेच्या व्यवहारात कटाक्षानं आणि सावधगिरीनं कामं करा. सिंह- आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. आज आपल्याला शरीर आणि मन दोन्हीसाठी विश्रांती आवश्यक आहे. हे वाचा-कोरोनापासून बचावासाठी कधी आणि किती वेळा प्यावा काढा? कन्या- सकारात्मक विचारांनी आपल्या समस्या सोडवा. कामाच्या ठिकाणी आपल्या शत्रूंवर लक्ष ठेवा. जोडीदारासोबत वेळ घालवा. तुळ- घरगुती समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि प्रभावाचा वापर केला पाहिजे. सावधगिरी बाळगा, कारण प्रेमात पडणे आज आपल्यासाठी इतर अडचणी निर्माण करू शकते. वृश्चिक- गुंतवणुकीसाठी दिवस चांगला नाही. अपेक्षेनुसार जरी आज काही घडलं नाही तरी निराश होऊ नका. धनु- जास्त काम करणं टाळा. आज आपल्याला थकवा जाणवेल. मकर - गुंतवणूक करणं आज टाळा त्यामुळे आज नुकसान होऊ शकतं. वादग्रस्त विषयांमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या. कुंभ- आजचा दिवस फायदा देणारा आहे. जोडीदाराचे आज आपल्याकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला राग येऊ शकतो. मीन- रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. छंद जोपासा त्यामुळे आपल्या थकवा दूर होईल.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: