मुंबई, 06 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानं कोणती याची पूर्णकल्पना आली तर सोडवणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष - बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज आपल्या विश्वासाला तडा जाईल. आपल्या वागण्याचा प्रिय व्यक्तीला त्रास होऊ शकतो.
वृषभ- सकारात्मक वृत्तीनं कठीण परिस्थितीवर मात करा. धैर्य सोडू नका. दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. प्रिय व्यक्तीच्या अवास्तव मागण्या पूर्ण करू नका.
मिथुन- आरोग्याची काळजी घ्या. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कर्क- खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. जोडीदाराचं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
सिंह - आर्थिक अडचणी दूर होतील. आजचा दिवस आपल्याला सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. जोडीदारामुळे आज नुकसान होऊ शकतं.
कन्या- कोणतीही गोष्ट घाईगडबडीनं करू नका. स्वर्थी लोकांनमुळे आज नात्यांमध्ये दुरावा येईल. आज आपली चिडचिड होऊ शकते.
तुळ- भावनिक गोंधऴ उडाले. गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा.
वृश्चिक- आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीची कसू. चौकशी करा. जोडीदारासोबत वेळ घालवा.
धनु- आपल्याकडून अपेक्षांची पूर्तता न झाल्यास राग येऊ शकतो. ऐकलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
मकर- समस्यांमध्ये अडकून राहिलात तर अस्वस्थ व्हाल. आता घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर असतील.
कुंभ- खर्चावर नियंत्रण नियंत्रण ठेवा. इतरांच्या मदतीशिवाय तुम्ही गोष्टी करू शकता असा विश्वास असेल तर तसं नाही होणार. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.
मीन- नातेवाईक, आप्तेष्ट आज आपल्यासोबत संपर्क करतील. आजचा काळ आपल्यासाठी थोडात्रासदायक असेल. जोडीदारासोबत आज वाद होऊ शकतात.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.