Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना प्रगतीमध्ये येतील अडथळे

राशीभविष्य : मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींना प्रगतीमध्ये येतील अडथळे

कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना वाचा 12 राशींचं भविष्य.

    मुंबई, 06 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील अडीअडचणी आणि समस्यांची चाहूल लागली तर त्या दृष्टीनं तोडगा काढण्यासाठी विचार करता येऊ शकतो किंवा समस्या टाळण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात त्यासाठी जाणून घ्या 12 राशीचं आजचं भविष्य. मेष- कामाचा ताण अधिक असल्यानं चिडचिडे व्हाल. थकवा आणि तणाव येईल. आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. वृषभ- आज आपल्याला चांगली बातमी मिळेल. गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. मिथुन- आज आपल्या आरोग्याची काळजी घ्या. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. पूर्ण एकाग्रतेने कार्य करा, आपली प्रगती निश्चित आहे. कर्क- कामात हस्तक्षेप करणाऱ्याचा आज आपल्याला राग येऊ शकतो. आज आपल्यावर कामाचा ताण अधिक असेल. प्रेमासाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. सिंह- गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. कन्या- पायऱ्या चढताना विशेष रुग्णाची काळजी घ्यावी. आज जोडीदारानं आपल्याकडे दुर्लक्ष केल्यास वाईट वाटू शकतं. हे वाचा-शिक्षकाच्या निर्जीव बोटांनी भरले शाळेच्या भिंतीवर आनंदाचे रंग; असं पालटलं रुप तुळ- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्या क्षेत्राच्या दृष्टीकोनातून आहे. त्याचा पूर्ण फायदा घ्या. आपली वैयक्तीक माहिती कुणालाही देऊ नका. वृश्चिक- आज आपल्याला बराच मोकळा वेळ मिळेल. प्रवासाच्या संधींना हातातून जाऊ देऊ नका. धनु- आज आपली खूप चिडचिड होऊ शकते. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहाणं धोकादायक ठरेल. मकर - खाद्य-पदार्थांवर काळजी घ्या. वाद-विवादांचा सामना करावा लागू शकतो. कुंभ- आज आपल्याला सुस्तपणा जाणवेल आणि आळस येईल. प्रिय व्यक्तीसोबत असणारे वाद मिटतील. मीन-भावनिकरित्या खूप चांगला दिवस नाही. आज आपण सहजपणे पैसे जमा करू शकता. लोकांना दिलेले जुने कर्ज फेडू शकता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या