राशीभविष्य : कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस

राशीभविष्य : कन्या आणि मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस

  • Share this:

मुंबई, 31 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे येणाऱ्या समस्या आणि संभाव्य धोके माहीत असतील तर त्याचं निराकरण करणं अधिक सोपं जात त्यासाठी जाणून घ्या कसा असेल 31 मेचा दिवस.

मेष - भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचण वाटेल, आपली विचित्र वृत्तीमुळे त्रास होऊ शकतो.

वृषभ- आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वत: वर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे.

मिथुन- जास्त काळजी केल्याने मानसिक शांती नष्ट होऊ शकते. घाईनं निर्णय घेऊ नका.

कर्क- भुतकाळातील गोष्टींचा आपल्याला पुन्हा त्रास होऊ शकतो. व्यवसायाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सिंह - आर्थिक अनिश्चितता आपल्याला मानसिक ताण देऊ शकते. प्रलंबित कामं लवकर मार्गी लावा.

कन्या- धीर सोडू नका. आपला समजूदारपणामुळे यश आपलंच आहे. गुंतवणूक करण्याचा दिवस चांगला आहे. योग्य सल्ल्यानेच गुंतवणूक करा.

तुळ- कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे ताण निर्णय होईल. गैरसमजांमुळे आपण आणि आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये काही मतभेद होऊ शकतात.

वृश्चिक- आज तुम्हाला थकवा व तणाव जाणवेल. आपण इतरांवर अधिक खर्च कराल.

धनु- मालमत्ता-संबंधित व्यवहार पूर्ण होतील आणि त्याचा फायदा होईल. आपल्या जोडीदाराकडे कोणत्याही गोष्टीबद्दल आज तक्रार करणं टाळा.

मकर- प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. गोष्ट इच्छेप्रमाणे होणार नाहीत पण धीर सोडू नका.

कुंभ- नियमित व्यायाम करा. आपण आपल्या सर्जनशील प्रतिभेचा योग्य प्रकारे वापर केल्यास ते फायदेशीर ठरेल.

मीन- ऑफिसचे राजकारण असो किंवा कोणताही वाद असो आपल्या पथ्थी पडेल. एखाद्यास मदत केल्यानं समाधान मिळेल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 31, 2020, 8:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading