राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक लाभ

राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो आर्थिक लाभ

कसा असेल आजचा आपला दिवस जाणून घ्या 30 मेचं राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 30 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे येणाऱ्या समस्या आणि संभाव्य धोके माहीत असतील तर त्याचं निराकरण करणं अधिक सोपं जात त्यासाठी जाणून घ्या कसा असेल 30 मेचा दिवस.

मेष - कामाचा ताण आणि घरगुती मतभेद यामुळे ताण येऊ शकतो. चुकीच्या आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा.

वृषभ- कंटाळवाणा दिवस वाटेल. अनेक कामं पुढे ढकलली जाऊ शकतात आणि त्यामुळे निराशा येऊ शकते.

मिथुन- ताण घेणं आणि काळजी करण्याची सवय आपल्या आरोग्याला हानिकारक आहे. आज आपल्याला थकवा जाणवेल.

कर्क- मानसिक ताण हे आपल्या आजाराचं मूळ कारण असेल. अचानक आलेले पैसे हातात राहणार नाहीत. प्रेमात पडाल.

सिंह - आजचा दिवस आनंदी असेल. पण आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला टीका आणि वाद-विवादांचा सामना करावा लागू शकतो.

कन्या- धार्मिक आणि अध्यात्मिक कामात आपलं मन रमवा. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. प्रेम जीवनात नवीन आशेचा किरण घेऊन येईल.

तुळ- आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला नक्कीच यश मिळेल, एकामागून एक महत्त्वाची पावले उचलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांसाठी नम्र आणि आनंददायी व्हा.

वृश्चिक- जास्त काम करणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला फक्त तणाव व थकवा मिळेल. आपण इतरांवर अधिक खर्च करू शकता. मुलांचे आरोग्य जपा

धनु- आपल्या संशयी वृत्तीमुळे त्रास होऊ शकतो. नवीन प्रकल्प आणि कामे राबविण्याचा एक चांगला दिवस आहे.

मकर- स्वत: ला अधिक आशावादी होण्यासाठी प्रवृत्त करा. लोकांचा सल्ला घेऊन पैसे गुंतवणे हा यशाचा मंत्र आज आहे.

कुंभ- कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दबावामुळे आणि घरात आपोआप होणारी तणाव यामुळे तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.

मीन- वाद होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन कल्पनांमुऴे आज आपला आर्थिक फायदा होईल.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 7:46 AM IST

ताज्या बातम्या