राशीभविष्य : मीन आणि धनु राशीच्या व्यक्तींना आज कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही

राशीभविष्य : मीन आणि धनु राशीच्या व्यक्तींना आज कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा तर कोणाला करावा लागणार आव्हानांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आशावादी व्हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा. नकारात्मक भावना कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

वृषभ- आज आपला मनोरंजनातून खूप चांगला वेळ जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. प्रेमात अडथळे येतील.

मिथुन- खर्चावर वेळीच नियंत्रण घाला. एकतर्फी प्रेमात आपला वेळ वाया घालवू नका. व्यवसायासाठी उत्तम दिवस आहे.

कर्क- सकारात्मक भावना आणि विचार करा. अंदाजानुसार पैसे गुंतविण्यास चांगला दिवस नाही.

सिंह- आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. जोडीदारामुळे थोडे नुकसान होऊ शकते.

कन्या- दीर्घ काळापासून असलेल्या आजारातून आपल्याला आज सुटका मिळेल. आज रागावर नियंत्रण ठेवायला हवं. जोडीदाराच्या वागण्यामुळे खूप अस्वस्थ व्हाल.

तुळ- खर्चावर नियंत्रण ठेवा. आपला गैरफायदा घेऊ शकतात अशा लोकांपासून 4 हात लांब राहा. नकारात्मक लोकांपासून लांब राहा.

वृश्चिक- आपल्या आरोग्याची काळजी घ्या. गैरसमजातून मतभेद होऊ शकतात.

धनु- आज आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवा. नवीन योजना पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करा. आज आपल्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते.

मकर - मित्रांच्या मदतीमुळे आज आपल्या अडचणी दूर होतील. रागावर नियंत्रण ठेवा अन्य़था आज आपलं नुकसान होऊ शकतं.

कुंभ- आज आपल्याला थोडा आराम मिळेल. प्रिय व्यक्ती आज आपल्याला आनंदी ठेवतील. व्यवसायात नव्या वाटांबाबत विचार करा.

मीन- आर्थिक व्यवहारात अडकणार नाही याची काळजी घ्या. आपल्या मार्गापासून दूर जावे लागेल. कठोर परिश्रम करावे लागतील.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 3, 2020, 7:16 AM IST

ताज्या बातम्या